औषधाचे 30 रुपये मागितले म्हणून तलाठ्याची मेडिकल मालकाला मारहाण

देवरी पोलिसांनी आरोपी तलाठी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Gondia
Gondia Saam TV

गोंदिया: औषधाचे पैसे का मागितले म्हणून तलाठ्याने एका मेडिकल मालकाला मारहाण केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia District) देवरी येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपी तलाठ्याविरोधात देवरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद शेडे असे जखमी मेडिकल मालकाचे नाव असुन प्रकाश चव्हाण असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. देवरी शहरातील पोलीस स्टेशन समोर असलेल्या श्री गणेश मेडीकलचे मालक अरविंद शेंडे हे रात्री 9.30 वाजता आपले मेडिकल बंद करत असताना चिचगड येथील तलाठी प्रकाश चव्हाण हे मेडीकल स्टोअरमध्ये आले.

मेडिकल मालक अरविद शेंडे यानां औषधं मागीतली, तसे औषधे देत औषधाचे 30 रुपये तलाठी यांना मागीतले असता आरोपी तलाठी प्रकाश चव्हाण यांनी मेडीकल मालकास तू मला पैसे मागतो का, मला ओळखत नाही का..? असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी मेडीकल मालक अरविंद शेडे यांनी देवरी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. देवरी पोलिसांनी आरोपी तलाठी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com