
अमर घटारे -
अमरावती : अमरावती जिल्ह्यतील (Amravati District) चांदुर रेल्वे तालुक्यतील नेकणाणपूर येथील पुंडलिक काळे हे बत्तीस वर्षापूर्वी मनावर परिणाम झाल्याने कोणालाही न सांगत घर सोडून निघून गेले होते. त्यानंतर पुन्हा घरी परतले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा त्यांच्या येण्याची आशा सोडली होती. मात्र आता तब्बल ३२ वर्षांनी घरी परतले आहेत.
पुंडलिक काळे हे भटकत भटकत थेट केरळ (Keral) या राज्यात पोहचले होते. केरळमध्ये ते कोणी जे देईल ते खाऊन व जागा मिळेल तेथे झोपत होते. सुमारे १८ वर्षापूर्वी, केरळ येथील दिव्य करुणा चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वयंमसेवकांना ते आढळले.
पाहा व्हिडीओ -
त्यानंतर ते स्वयंमसेवक त्यानां आश्रममध्ये नेऊन त्यांच्यावरती तब्बल १८ वर्ष दिव्य करुणा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी उपचार केले. त्यानंतर काही दिवसांनी पुडलिक काळे यांनी नांव व पत्ता तेथील स्वयंमसेवकांना सांगितल्यानंतर ट्रस्टने चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला फोन करून ट्रस्टचे सेवक थेट केरळ वरून चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला (Chandur Railway Police Station) पोहचले आणि त्यांनी पुंडलिक काळे यांना त्यांच्या घरी पोहचविले. त्यावेळी त्यांच्या पत्नी ने आरती ओवाळून त्यांचे स्वागत केले.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.