१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सरकार आणि राज्यपाल यांच्यात बैठक
राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत बैठक संपन्नSaamTv

१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सरकार आणि राज्यपाल यांच्यात बैठक

या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती.

गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांचा मुद्दा प्रलंबित आहे. याच मुद्द्यावरून राज्यपाल, महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये राजकीय वातावरण अनेकदा तापल्याचे महाराष्ट्राने अनुभवले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जाणीवपूर्वक नियुक्तीचा मुद्दा रेंगाळत ठेवत असल्याचा आणि भाजप पूरक राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने वेळोवेळी केला आहे. आज याच मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्यपालांसोबत राजभवनावर बैठक पार पडली.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या बारा जागांवर नियुक्ती का रखडवण्यात आली आहे? असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल व महाविकास आघाडी सरकारला नोटीस बजावून फटकारले देखील होते. जवळपास वर्षभरापासून संविधानिक असणाऱ्या या पदांना रिक्त ठेवून राज्यपाल आणि राज्य सरकार यात समन्वयाचा अभाव असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले होते.

राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत बैठक संपन्न
Breaking News : अनिल देशमुखांच्या जावयाचे अपहरण; देशमुख कुटुंबीयाचा आरोप

महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांनी प्रत्येकी चार यानुसार १२ सदस्यांची नामनिर्देशित यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. नियुक्त्यांचे हे प्रकरण न्यायालयात देखील गेले होते. त्यामुळे हाय व्होल्टेज असणारा हा मामला आज तरी सुटणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून होते. अखेरीस हा मुद्दा अनुत्तरीतच राहिला असून आज केवळ चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com