मेहकर तहसील कार्यालयातील सर्व विभागाचे कुलूप अज्ञाताने फोडले !
मेहकर तहसील कार्यालयातील सर्व विभागाचे कुलूप अज्ञाताने फोडले !संजय जाधव

मेहकर तहसील कार्यालयातील सर्व विभागाचे कुलूप अज्ञाताने फोडले !

मेहकर येथील भरवस्तीत असलेल्या तहसील कार्यालयातील जवळपास 5 ते 6 विविध विभागातील दरवाजाचे कुलूप अज्ञात आरोपीने तोडले आहेत.

संजय जाधव
बुलढाणा : मेहकर Mehekar येथील भरवस्तीत असलेल्या तहसील कार्यालयातील जवळपास 5 ते 6 विविध विभागातील दरवाजाचे कुलूप अज्ञात आरोपीने तोडले आहेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यासंदर्भात मेहकर पोलिस Police स्टेशनमध्ये या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा-

मेहकर शहराच्या मधोमध तहसील Tehsil कार्यालय आहे. अज्ञात आरोपीने उशिरा रात्री तहसीलदार यांची केबिन, तहसील कार्यालयातील कॅन्टीन, निराधार कार्यालय ,अन्न पुरवठा विभाग कार्यालय, उपविभागीय अधिकारी यांच्या बाजूचे कार्यालय आदी ठिकाणचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडले आहे.

मेहकर तहसील कार्यालयातील सर्व विभागाचे कुलूप अज्ञाताने फोडले !
भाजपाचे माजी नगरसेवक विवेक यादवला अटक

विविध कार्यालयातील सामानाची नासधूस केली असून तहसील कार्यालयात असलेल्या कॅन्टीन मधील एक सिलेंडर चोरून नेले आहे. यासंदर्भात पोलिस विभागाने तहसील कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत असल्याने चोरट्याचा शोध घेणे कठिन झाले आहे.
नायब तहसीलदार परळीकर मॅडम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com