मेळघाटात रस्त्यावर उतरले बहुरूपी देव

मेळघाटात बहुरूपी समाज रस्त्यावर उतरून करतोय कोरोनाची जनजागृती
मेळघाटात रस्त्यावर उतरले बहुरूपी देव
मेळघाटात रस्त्यावर उतरले बहुरूपी देवसंजय जाधव

संजय जाधव

अमरावती - जिल्ह्यात कोरोना Corona रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी नियमांचे पालन काटेकोर पणे करा असे आवाहन जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना करीत असते मात्र अनेक नागरिक याकडे सातत्याने दुर्लक्ष करतात. मात्र, आता जिल्हा प्रशासनाच्या मदतीला जिल्ह्यातील बहुरूपी समाज रस्त्यावर उतरला असून मेळघाट Melghat मधील आदिवासी बांधवाना ते कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगत आहेत.

हे देखील पहा -

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या परिसरात भगवान विष्णू, शंकर, आणि गणेशाची वेशभूषा परिधान केलेले हे तीन बहुरुपिया मेळघाट मधील आदिवासी बांधवाना कोरोना या विषाणू जन्य आजाराची माहिती व त्या पासून आपला बचाव कसा करायचा याचे महत्व पटवून देत आहेत. मेळघाट मधील रस्त्यांनावर अचानक देव उतरले असल्याने आदिवासी बांधवांमध्ये याचे विशेष आकर्षण आहे. हे तिन्ही देव एकत्र रस्त्यावर पाहून नागरिकही आकर्षित झाले आहेत.

मेळघाटात रस्त्यावर उतरले बहुरूपी देव
पुढील काही तासांत मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

बहुरूपिया समाज राजा महाराजांच्या काळा पासून अस्तित्वात आहे. बहारूपिया समाज कोरोना महामारीच्या काळात मोठ्या अडथळ्यांमध्ये दिसुन आले होते. विशेषत: लॉकडाऊन मध्ये या समाजाला उपासमारीचा सामना करावा लागला होता. आजच्या आधुनिक युगात मनोरंजनाचे विविध स्त्रोत सहज उपलब्ध आहेत. ज्यात आपण अश्या लोकांकडे आणि त्यांच्या मनोरंजनाकडे काही लक्ष देत नाही, परंतु सरकार आणि प्रशासनाने व आपण सर्वांनी बहुरूपी समाजाकडे पाहण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com