
Menstrual cycle : महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना सुट्टी द्यावी अशी मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही या याचिका फेटाळली आहे. (Latest Menstrual cycle News)
सरकारच्या धोरणात्मक कक्षेत हे प्रकरण येत असल्याने हे प्रकरण केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाला सोपवता येऊ शकते असं न्यायालयाने म्हटलं आहे. ही याचिका शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी दाखल केली होती. याचिकेत मातृत्व लाभ अधिनियम- 1961 कलम 14 अंतर्गत राज्यांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.
बिहारमध्ये महिलांसाठी वेदना रजा
मासिक पाळी दरम्यान विद्यार्थीनी, कर्मचारी महिला यांना बाहेर प्रवास करण्यास त्रास होतो, वेदना होतात. या काळात अनेक महिलांना सक्त आरामाचीही गरज असते. बिहार येथे मासिक वेदना रजा दिली जाते. समाजाच्या विधिमंडळ आणि इतर भागधारकांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलं आहे, असं याचिकेत नमुद करण्यात आलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयालाचा पर्याय सुचवला आहे. त्यामुळे केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयात धाव घेणे गरजेचे आहे. यासाठी योग्य मुद्दे समोर आणल्यास महाराष्ट्रात देखील महिलांना मासीक पाळी दरम्यान वेदना रजा मिळू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
केरळमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीत आराम मिळावा यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांंनी तशी घोषणा केली आहे. केरळ सरकारच्या या निर्णयाचे महिलांनी मोठं स्वागत केलं आहे. महाराष्ट्रात देखील हा निर्णय घेण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.