'जे राज्य सरकार कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा'

Gopichand Padalkar
Gopichand Padalkar

सांगली : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी आता शेतकऱ्यांचा आसूड हातात घेऊन रस्त्यावर उतरावं असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. एसटीचे विलिनीकरण झाले पाहिजे अशी मागणी करत यासाठी लढा उभारण्याचा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. यापुढे युनियन मुक्त कर्मचारी असा नाराही पडळकरांनी दिला. आटपाडी येथील झरे येथे आमदार पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. merge-msrtc-in-maharashtra-government-demands-gopichand-padalkar-sangli-news-sml80

आमदार पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झरे येथे संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून सुरू असणारी लूट आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि विविध मागण्यांच्या बाबतीत चर्चा झाली.

Gopichand Padalkar
काेराेना हा जन्माच्या आधी पासून! ताे राहणारच; उदयनराजे

आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar म्हणाले राज्यातल्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारला साडेतीन हजार कोटींचा कर गोळा होतो. परंतु तुलनेने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खूप कमी आहेत. पगार देखील त्यांना वेळेत मिळत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न असो किंवा अन्य सुविधांचा प्रश्न असाे हे प्रश्न राज्य सरकार मार्गी लावत नाही. केवळ महामंडळ असल्याने एसटी कर्मचा-यांवर अन्याय केला जात असून तो आता यापुढे खपवून घेतला जाणार नाही.

जे राज्य सरकार कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा. सरकार हा निर्णय घेणार नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांनीही आपल्या न्याय हक्कासाठी आता शेतकऱ्यांचा आसूड घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या युनियन संघटनांनी पुढे येणे अपेक्षित होते. या संघटना केवळ सभासदांकडून कोट्यवधी रुपये गोळा करत आहेत. त्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत नीट शिक्षण सुद्धा घेत येत नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आता युनियन सभासदाचा राजीनामा देऊन युनियनची असणारी फलके उखडून फेकावीत असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com