
Meta Global Layoffs : फेसबुकची पॅरेन्ट कंपनी (Facebook's parent company) मेटाने पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावर ६ हजार कर्मचार्यांना प्रभावित करणार्या मेटाच्या तिसर्या टप्प्यातील (Meta Layoffs Third Round) कपातीचा भारतातील अनेक कर्मचार्यांना फटका बसला आहे. यात वरिष्ठ अधिकार्यांचाही समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार भारतातील विपणन संचालक अविनाश पंत, मीडिया भागीदारी संचालक साकेत झा सौरभ आणि मेटा इंडियाच्या कायदेशीर संचालक अमृता मुखर्जी या भारतातील अधिकाऱ्यांना नारळ (Meta Layoffs 2023) देण्यात आले आहे.
मनीकंट्रोलने सर्वप्रथम अमृता मुखर्जी ज्या मेटामध्ये जाण्यापूर्वी हॉटस्टारच्या कायदेशीर प्रमुख होत्या त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त दिले होते. सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये मार्केटिंग, अॅडमिनिस्ट्रेशन, ह्यूमन रिसोर्स आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना या जागतिक स्तरावरील कपातीचा फटका बसला आहे.
भारतात नुकत्याच करण्यात आलेल्या कपातीवर कंपनीकडून अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. मेटामध्ये बिझनेस इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या सुरभी प्रकाशने तिला राजीनामा देण्यास सांगितल्याची पोस्ट लिंक्डइनवर केली आहे. "ते संपल्याचं दुःखद आहे पण हे घडल्याचा आनंद झाला, अखेर चिंता संपली" अशी पोस्ट सुरभी प्रकाशने केली आहे.
मेटा ने बुधवारी कपातीच्या नवीन फेरीला सुरुवात केली, ज्याचा परिणाम जागतिक स्तरावर सुमारे ६ हजार कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ही नोकरी कपात कंपनीच्या तथाकथित "कार्यक्षमतेचे वर्ष"चा भाग आहे आणि खर्च कमी करण्यासाठी मेटाची पुनर्रचना केली जात आहे. (Breaking News)
नोकर कपातीच्या या तिसऱ्या फेरीचा परिणाम मुख्यतः मेटाच्या बिझनेस विभागांवर परिणाम झाला. मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी कंपनी एप्रिलच्या शेवटी आणि मेच्या अखेरीस दोन फेऱ्यांमध्ये १० हजार नोकऱ्या कमी करेल, अशी कल्पना मार्चमध्येच दिली होती. मेटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. सुमारे २१ हजार लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.