
पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
जुलै महिन्यात धुव्वांधार बरसणारा पाऊस ऑगस्टमध्ये संपूर्ण राज्यावर रुसून बसला होता. मात्र, सप्टेंबर महिना सुरू होताच पाऊस पुन्हा परतला. कृष्ण जन्माष्टमीपासून सलग तीन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी (Rain Updates) कोसळल्या. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती.
आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार असून आजपासून पुढील तीन दिवस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Rain Alert) होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या ४ जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. याशिवाय हवामान खात्याने मुंबई, पुणे, ठाण्यासह २६ जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.