राहुरीतील पाणी योजनांना मीटर बसवणार - मंत्री तनपुरे

राहुरीतील पाणी योजनांना मीटर बसवणार - मंत्री तनपुरे
मंत्री प्राजक्त तनपुरे

राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघातील मिरी-तिसगाव, बुऱ्हाणनगर, बारागाव नांदूरसह चौदा गावे, कुरणवाडी व इतर गावे पाणीपुरवठा योजनांना मीटर बसविण्यात येतील. केंदळ खुर्द-मानोरी रस्त्यावरील बंधाऱ्याच्या पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

मुळा धरण येथील विश्रामगृहावर मंत्री तनपुरे यांनी जलजीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.Meters will be installed in water schemes in Rahuri - Minister Tanpure

मंत्री प्राजक्त तनपुरे
मोदींनी सहकार मंत्रीपद कशासाठी निर्माण केलं, हे अनाकलनीय

मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, गटविकास अधिकारी गोविंद खामकर (राहुरी), शीतल खिंडे (पाथर्डी), ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी प्रवीण जोशी (नगर), अनिल सानप (पाथर्डी), जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, पोपट भणगे, पाणीयोजनांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, भास्कर गाढे, पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, बाळासाहेब लटके, सुरेश निमसे, अविनाश ओहोळ, बाबासाहेब भिटे, काशिनाथ लवांडे, गोविंद मोकाटे, अमोल भनगडे, सुयोग नालकर, सुनील मोरे, बाळासाहेब खुळे, सचिन भिंगारदे, संतोष आघाव, धीरज पानसंबळ आदी उपस्थित होते.

मंत्री तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत शासनाच्या विविध निधीतून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. केंदळ खुर्द-मानोरी रस्त्यावरील बंधाऱ्याच्या पुलाच्या कामाचा प्रस्ताव जलसंपदा विभाग, नाशिक येथे अंतिम मंजुरीसाठी आहे. पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न लवकरच सुटून ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघेल. पाणीयोजनांचे थकीत वीजबिल भरून योजना सुरळीत कराव्यात, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

मीटर नसल्याने अनेक पाणीयोजनांची बिलेच भरली जात नाहीत. परिणामी त्या संस्था बंद पडतात. यात शासनानेचही मोठे नुकसान होते.Meters will be installed in water schemes in Rahuri - Minister Tanpure

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com