डिसेंबर 2023 मध्ये गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणार - मिलिंद परांडे

पाया भरणी साठी 300 फूट पेक्षा मोठा खड्डा खोदण्यात आला त्यावर काम सुरू झाले आहे.
डिसेंबर 2023 मध्ये गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणार - मिलिंद परांडे
डिसेंबर 2023 मध्ये गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणार - मिलिंद परांडेSaam Tv

मंगेश मोहिते

नागपूर - अयोध्येत Ayodhya डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि दर्शन सुरू होईल. त्यानंतर पुढील मंदिराच काम सुरू राहील असे विश्वहिंदू परिषदेचे Vishwa Hindu Parishad केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे Milind Parande यांनी सांगितले ते नागपुरात Nagpur पत्रकारांशी संवाद साधत होते. श्रीराम Ram जन्मभूमीच्या मंदिराचे काम प्रगतीवर आहे. पाया भरणी साठी 300 फूट पेक्षा मोठा खड्डा खोदण्यात आला त्यावर काम सुरू झाले आहे. ते काम सप्टेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल आणि डिसेंबर 2023 मध्ये गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणार असे देखील ते म्हणले.

डिसेंबर 2023 मध्ये गर्भगृहात रामलल्ला विराजमान होणार - मिलिंद परांडे
हद्दच झाली! युवकाने चक्का फोन गिळला; परंतू परिस्थिती सुखरुप

पुढे ते म्हणाले की, जावेद अख्तर यांचे स्थान समाजात मोठे आहे. ते मोठ व्यक्ती आहे पण त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केले ते योग्य नाही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विश्वहिंदू परिषदेने केली आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्वहिंदू परिषद यांची तुलना तालिबान सोबत केली त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्वहिंदू परिषद यांना तालिबान म्हटले आहे. तालिबान क्रूर आहे त्यांच्या सोबत संघ आणि बजरंग दलची तुलना करणे योग्य नाही.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com