बीडमध्ये पैशांचा पाऊस पाडतो सांगत युवकांना लाखो रुपयांचा गंडा!

पैशाचा पाऊस पडतो म्हणून एका मांत्रिकाने, बीड जिल्ह्यातील खालापुरी मधील पाच युवकांना, तब्बल साडेतीन लाखांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
बीडमध्ये पैशांचा पाऊस पाडतो सांगत युवकांना लाखो रुपयांचा गंडा!
बीडमध्ये पैशांचा पाऊस पाडतो सांगत युवकांना लाखो रुपयांचा गंडा!विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: पैशाचा पाऊस Money Shower पडतो म्हणून एका मांत्रिकाने, बीड Beed जिल्ह्यातील खालापुरी मधील पाच युवकांना, तब्बल साडेतीन लाखांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसापूर्वी शिरूर कासार पोलीस गस्तीवर असतांना, खालापुरी येथे एका वाहनात पैसे मोजत असताना, काही युवकांना नोटा मोजन्याचे मशीन व पैशाच्या बॅगसह ताब्यात घेण्यात आले होते.

हे देखील पहा-

त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याचे प्रथमदर्शी समोर आले होते. मात्र या प्रकरणात आता वेगळेच वळण मिळाले आहे. शिरूर कासार पोलीस ठाण्यातील खोट्या नोटा खेळण्यातील आहेत का ? हे दाखवण्याची विनंती पत्रकारांनी केली असता, पोलिसांनी या नोटा दाखवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला असून पोलिस या नोटा का लपवत आहेत ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. मात्र यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता बोलण्यास त्यांनी नकार दिला.

बीड जिल्ह्यातील रायमोह आतील पाच युवकांना मांत्रिकाने प्रथम अंबाजोगाई अहमदपूर येथे बोलावले, युवकांकडून 3 लाख 50 हजार रुपये देऊन त्याबदल्यात एक बॅग दिली आणि त्यात तिप्पट रक्कम असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर येथे पोलीस आहेत, तुम्ही येथून जा असे सांगून मांत्रिक निघून गेला. मुलांनी बॅग उघडली त्यावेळेस त्यात बच्चोका बँक असे छापलेल्या खेळण्यातील नोटा असल्याने, फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले.

बीडमध्ये पैशांचा पाऊस पाडतो सांगत युवकांना लाखो रुपयांचा गंडा!
Pune: मावळातील भडवली गावात सार्वजनिक जेवणातून नागरिकांना विषबाधा!

त्याच नोटा मोजत असताना शिरूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने रात्री गस्त घालताना, त्यांना खालापुरी येथे एका वाहनात खोके व पैसे मोजण्याची मशीन आढळली. यावेळी पाच तरुणांना ताब्यात घेतले होते.त्यामुळे बनावट नोटांचे रॅकेट असल्याचे प्रथमदर्शी समोर आले होते. मात्र या तरुणांची फसवणूक करून मांत्रिकाने यांना खेळण्यातील नोटा हवाली केल्या, त्यामुळे या प्रकरणात आता शिरूर कासार पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com