नांदेड : ६७ वाहनांच्या लिलावातून लाखोंचा महसूल जमा- चंद्रशेखर कदम

बोली लावणारे व्यक्ती यांनी बोली बोलून त्या प्रमाणे खरेदी केलेले सर्व वाहने स्क्रॅब ( भंगार ) मध्ये विकण्याच्या अटीवर देण्यात आले आहेत. ही वाहने पुन्हा वापरता येणार नाहीत.
नांदेड : ६७ वाहनांच्या लिलावातून लाखोंचा महसूल जमा- चंद्रशेखर कदम
नांदेड शहर वाहतुक शाखेकडून बेवारस वाहनांचा लिलाव

नांदेड : शहरातील वाहतूक शाखा क्रमांक एकने बेवारस ६७ वाहनांची लिलाव प्रक्रिया पूर्ण केली. त्यातून शासनाच्या खात्यावर तीन लाख ४२ हजार रुपये जमा होणार आहेत. बोलीधारकांना पैसे भरण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

ता. सात जुलै रोजी शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांचेकडून पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेवारस वाहनांची लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी पोलिस उप अधीक्षक ( गृह ) विकास तोटावार, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस कल्याणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, संतोष केदासे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार गंगाधर जाधव, किरण अवचार, रणजित नरवाडे, अंकुश आरदवाड, रवींद्र राठोड, अभय जाधव, सय्यद अझर, श्रीकांत वाकोडे, विष्णू कदम, सिद्धू सोनसळे, वाजीद, महिला पोलिस अंमलदार प्रियंका कदम, सपना शिंदे, अर्चना भाकरे, ज्योती गायकवाड, दत्ता सूर्यवंशी, उद्धव पांचाळ, चाऊस मेजर इत्यादी उपस्थित होते.

हेही वाचा - Good News : आर्यन देशमुख चिकाळेकर भारतीय युद्ध नौकेत लेफ्टनंटपदी

बोली लावणारे व्यक्ती यांनी बोली बोलून त्या प्रमाणे खरेदी केलेले सर्व वाहने स्क्रॅब ( भंगार ) मध्ये विकण्याच्या अटीवर देण्यात आले आहेत. ही वाहने पुन्हा वापरता येणार नाहीत. या वाहनांचे आरटीओकडील रजिस्ट्रेशन रद्द होणार आहे. सदरची वाहने मागील चार वर्षांपासूनच्या कालावधीत जमा झालेली आणि कोणीही त्यावर हक्क सांगितला नसल्याने सदरची लिलाव कार्यवाही करण्यात आली आहे. या लिलाव प्रक्रियेत एकूण १५ बोलिधारकांनी भाग घेतला होता.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com