"...म्हणून महाराष्ट्रभर MIM चे कार्यकर्ते करताहेत राष्ट्रवादीत प्रवेश"

NCPचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितलं कारण...
"...म्हणून महाराष्ट्रभर MIM चे कार्यकर्ते करताहेत राष्ट्रवादीत प्रवेश"
"...म्हणून महाराष्ट्रभर MIM चे लोक करताहेत राष्ट्रवादीत प्रवेश"SaamTV

रश्मी पुराणीक -

लातूर : मुस्लिम मतांचे Muslim vote विभाजन व्हावे यासाठी भाजप MIM ला ताकद देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी केला आहे. लातूर मधील MIM कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. (MIM activists from all over Maharashtra are joining NCP)

या कार्यक्रमा मध्ये जयंत पाटील म्हणाले 'अल्पसंख्याक समाजाचे मान्यवर नेते भावनेच्या भरात एमआयएम मध्ये गेले होते. मात्र आता या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आहे की एमआयएमचा दुरुपयोग मत विभाजनासाठी करुन त्याचा फायदा भाजपला BJP होतं आहे. हे सर्व अल्पसंख्याक Minority समाजाला कळालं आहे आणि त्यातही मुस्लीम समाजाला आता हे चांगल्या प्रकारे कळालं असल्यामुळे आणि आधी केलेली चूक नंतर होवू नये यासाठी MIM चे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत येत आहेत असं पाटील म्हणाले.

हा तर राजकीय डाव...

"...म्हणून महाराष्ट्रभर MIM चे लोक करताहेत राष्ट्रवादीत प्रवेश"
चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ)

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना चांगलच उधान आलं आहे. भाजपा आमदार राम कदम BJP MLA Ram Kadam यांनी हे वक्तव्य म्हणजे राजकीय हेतून प्रेरीत केलेलं वक्तव्यं असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच लोकांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न असल्याचही ते म्हणाले. तसेच भाजपा आणि MIM च्या विचारसरणीत जमीन आसमानाचा फरक असल्याचही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.