शरद पवारांचा फोटो ट्विट करत, MIM खासदारांचा आघाडी सरकारला सवाल

MIM खासदार इम्तियाज जलील यांनी यापुर्वी देखील सरकारवरती निशाना साधला होता. सोलापुरातील भाषणामध्ये ते म्हणाले होते की, 'CORONA फक्त आमच्याच मागे का लागला आहे'.
शरद पवारांचा फोटो ट्विट करत, MIM खासदारांचा आघाडी सरकारला सवाल
शरद पवारांचा फोटो ट्विट करत, MIM खासदारांचा आघाडी सरकारला सवाल@imtiaz_jaleel/SaamTV

औरंगाबाद - MIM च्या वतीने उद्या शनिवार दि. 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. मात्र प्रशासनाने तिरंगा रॅलीला परवानगी नाकारल्याने रॅली निघणार का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान प्रशासनाने परवानगी दिली नसल्यामुळे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवरती ट्विटद्वारे (Tweet) टीका केली आहे. ट्विटरवरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या (Sharad Pawar) एका सभेचा फोटो पोस्ट करत यांच्या रॅलीला परवानगी दिली जाते. मग आमच्या रॅलीला परवानगी का दिली जात नाही, याबाबत महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण देऊ शकेल का?, असा सवाल विचारला आहे.

याआधी देखील जलील यांनी सरकारवरती निशाना साधला होता. सोलापुरातील भाषणामध्ये ते म्हणाले होते की, 'कोरोना फक्त आमच्याच मागे का लागला आहे त्यामुळे आमच्या मोर्चाना परवानगी मिळतं नाहीये. याउलट ज्यांची सत्ता आहे, ज्यांचा मुख्यमंत्री आहे. ते मोर्चे काढतायत त्यावेळी कोरोना नसतो का? , विना परवानगी भाजप (BJP) नागपूमध्ये मोर्चा काढते तर अजित पवार (Ajit Pawar) मोठ्या सभा घेतात त्यावेळेस कोरोना कुठे जातो? असं ते भाषणात म्हणाले होते.

परवानगी नाही दिली तरी येणार -

दरम्यान, 27 तारखेला MIM ने 'चलो मुंबई'चा नारा दिला होता मात्र त्याला कोरोनामुळे आघाडी सरकारने परवानगी नाही दिली. त्यामुळे आता 'चलो मुंबई' हा नारा नसेल, तर 11 डिसेंबरला 'मुंबई तो हम आयेंगे' हा नारा असेल, MIM चे कार्यकर्ते तिरंगा झेंडा घेऊन मुंबईला येणार, त्यामुळे परवानगी दिली तरी येणार आणि नाही दिली तरी मुंबईला येणारच.. असा जाहीर इशारा जलील यांनी सोलापुरच्या भाषणातून सरकारला दिला होता.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com