सांगली: बहरलेल्या 'मिनी कास पठार'ची पर्यटकांना भुरळ
सांगली: बहरलेल्या 'मिनी कास पठार'ची पर्यटकांना भुरळविजय पाटील

सांगली: बहरलेल्या 'मिनी कास पठार'ची पर्यटकांना भुरळ

विविध जातीच्या वेली फुलांनी बहरलेले कास पठार पर्यटकांना सध्या खुणावत आहेत.

विजय पाटील

सांगली :  नैसर्गिक सौंदर्यानं संपन्न असलेल्या सांगली कोल्हापूर Sangli Kolhapur सीमेवरील शित्तूर-वारूण ते उदगीरी या मार्गावरील विविध जातीच्या वेली फुलांनी बहरलेले कास पठार Kas Plateau पर्यटकांना सध्या खुणावत आहेत.

सांगली: बहरलेल्या 'मिनी कास पठार'ची पर्यटकांना भुरळ
सांगली: बहरलेल्या 'मिनी कास पठार'ची पर्यटकांना भुरळविजय पाटील

हे पठार सध्या सितेची आसवे, निलीमा, लाल गालीचा, जांभळी मंजीरी, पांढरे शुभ्र गेंद, दिपकाडीच्या व निळ्याशार आभाळी फुलांनी हे पठार सजले असून जणू हे पठार सध्या 'मिनी कास पठार'च ठरु लागले आहे.

हे देखील पहा-

शिराळा तालुक्यातील आरळा येथुन शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर-वारुण-राघुवाडा ते उदगीरी या मार्गावर अगदी रस्त्यालगतच हे पठार आहे. आरळा ते उदगीरी सडा कास पठार हा अंदाजे दहा किलोमिटर अंतराचा नागमोडी वळणाचा डांबरीकरण झालेला मार्ग आहे.

सांगली: बहरलेल्या 'मिनी कास पठार'ची पर्यटकांना भुरळ
मराठवाडा सुखावला! जायकवाडी ५८ टक्क्यांवर

हे पठार ज्याक्षणी नजरेस पडते त्याक्षणी माणसाची तहानभुक हरपुन जाते. पठारावर प्रवेश करण्याअगोदर सडयापासुन दोनशे ते तिनशे फुट अंतरापर्यंत पसरलेल्या विविध वनस्पती आणि गवताचे गालीचे पर्यटकांना अक्षरशा वेड लावत आहेत. तर सड्यावरील पठारावर प्रवेश करताच थंडगार अंगाला झोंबणारा गार वारा, सडयावरील काथळ दगडावर उमललेली शितेची आसवे, निलीमा तसेच विविध प्रकारची फुललेली फुले पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे.  पठारावर पसरलेली दाट धुक्यांची झालर पर्यटकांना मोहीत करून टाकत आहे. हे चांदोली धरणापासुन जवळजवळ 15 किमी अंतरावर आहे. परंतु पर्यटकांच्या नजरेपासुन दुर्लक्षीत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com