गडकरी पंतप्रधान झाले असते तर...;महाविकास आघाडीतील मंत्र्यांचं मोठं विधान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंत्रीमंडळात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखतात.
गडकरी पंतप्रधान झाले असते तर...;महाविकास आघाडीतील मंत्र्यांचं मोठं विधान
Nitin GadkariSaam Tv

बुलडाणा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या कामाच्या पध्दतीमुळे चांगलेच प्रसिध्द आहेत. विरोधी पक्षातील नेतेही त्यांच्या बाजूने नेहमी बोलत असतात. गडकरी फक्त विकास कामावरुन टीका करतात. ते विकासकामे सोडून बाकीच्या कोणत्याच मुद्द्यावर ते कधी बोलत नाहीत. आता महाविकास आघाडीतील मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नितीन गडकरी यांच्या विषयी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू काल बुलडाणा दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदींवर टीका करताना त्यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केलं. 'नितीन गडकरी (Nitin Gadkari) पंतप्रधान झाले असते तर रोजीरोटीचा प्रश्न मिटला असता', असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

Nitin Gadkari
पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? टाकी फुल्ल करण्यापूर्वी एकदा दर तपासा

बच्चू कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जळगाव जामोद तालुक्यातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला. जळगाव संग्रामपुर तालुका आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. आणि या परिसरात आरोग्य सुविधेचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. संपूर्ण तालुक्या करिता १०८ क्रमांकाची एकच रुग्णवाहिका असल्याने वेळप्रसंगी उपचारा अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. या गोष्टीचा विचार करून नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष राजेश लहासे ह्यांनी आपल्या स्वखर्चातून बच्चू कडू यांच्या आईच्या स्मृतिची आठवण म्हणून रुग्णवाहिका विकत घेऊन नागरिकांच्या सेवेत दाखल केली.

Nitin Gadkari
वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 जणांचा मृत्यू, 13 जखमी

या आयोजित कार्यक्रमास बच्चू कडू बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 'नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते तर देशातील अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला असता, मात्र दुर्दैव अस की मोदी पंतप्रधान (Narendra Modi) झाले आणि मंदिर मस्जिद चा प्रश्न मिटला. महागाईने कळस गाठला आहे. मात्र त्यांना काही घेणे देणे नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com