वसतिगृह व सांस्कृतिक भवनाचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा...; धनंजय मुंडेंचा इशारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तसंच औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या कामांची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली.
वसतिगृह व सांस्कृतिक भवनाचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा...; धनंजय मुंडेंचा इशारा
Dhananjay MundeSaam Tv News

मुंबई : चेंबुर येथील वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) सांस्कृतिक भवन तसंच औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या कामांची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात मुंडे यांनी या संस्थांच्या बांधकामासंबंधीत विकासकामांचा (Development) आढावा घेतला. या संस्थांच्या बांधकामासंबंधीत विकासकामे तीन महिन्याच्या आत पूर्ण करुन सामाजिक न्याय विभागाकडे या इमारती हस्तांतरीत कराव्यात. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा मुंडे यांनी संबंधीत प्रशासनाला दिला.

Dhananjay Munde
राज ठाकरेंनी माफी मागितली नाही तर...; भाजपच्या मुंबईतील पदाधिकाऱ्याचा इशारा

१२ वर्षांपासून रखडलेल्या चेंबूर येथील 1000 मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृह बांधकामाची पाहणी व आढावा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सा. बा. विभागाचे सचिव प्रशांत नवघरे,कोकण विभाग अभियंता रणजित हांडे, समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त वंदना कोचुरे, मुंबई उपनगरचे समाजकल्याण सहआयुक्त प्रसाद खैरनार, मुंबई शहरचे समाजकल्याण सहआयुक्त समाधान इंगळे,समाजकल्याण विभागाचे अपर सचिव अहिरे,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुरेखा पवार यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

चेंबूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, 750 क्षमतेचे मुलांचे व 250 क्षमतेचे मुलींचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे बांधकाम गेले काही वर्षांपासून रखडलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम बीओटी तत्वावर करत आहे.ज्या विकासकाडून काम केले जात आहे त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देवूनही कामं वेळेत पूर्ण केलेले नाही.हे काम तीन महिन्याचा आत पूर्ण न झाल्यास शासनाच्या निर्देशाप्रमाणे सदर विकासकावर दंडात्मक कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी,सामाजिक न्याय विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला आतापर्यंत विविध बांधकामासाठी निधी दिला आहे. याच ठिकाणी राज्यात कामे अपुरी आहेत असे निदर्शनास आले आहे.सामाजिक न्याय विभागाची राज्यातील प्रलंबित बांधकामाची सद्यस्थिती कळावी व त्यावरती तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी एक बैठक घेणे अत्यंत आवश्यक आहे.असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत.

Dhananjay Munde
'१४ मे'ला विरोधकांचा 'मास्क' काढणार; CM ठाकरेंचा इशारा

धनंजय मुंडे या पाहणी दौऱ्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले, या जागेत संत एकनाथ मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाबाबत विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होवू देणार नसून या वसतिगृहाच्या विकासाबाबतही योग्य तो निर्णय घेण्यात येईल.आज विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना वसतीगृहांची अत्यंत आवश्यकता आहे.यामुळे वसतिगृहाचे काम लवकर पूर्ण करावे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे काम अथवा वसतीगृहाची कामे नियोजित आराखडयानुसार होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कामामधील त्रुटी ठेवू नयेत असेही मुंडे म्हणाले.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.