राहुरी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान पार्कसाठी भरीव निधी

राहुरी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान पार्कसाठी भरीव निधी
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विद्यापीठात वृक्षारोपण.

रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार या क्षेत्रामध्ये कार्य फार मोठे आहे. या विद्यापीठास कृषी तंत्रज्ञान पार्कसाठी भरीव निधी देण्यासाठी सर्व प्रयत्न करू, असे प्रतिपादन ग्रामविकास व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वन महोत्सव सांगता समारंभात केले.

या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वन महोत्सव सप्ताहाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न झाला. पोपटराव पवार यांनी पाणलोट क्षेत्र विकासासाठी २८ लाखांच्या निधीचे पत्र कुलगुरुंना सुपूर्त केले. (Minister Mushrif will provide funds for Rahuri Agricultural University)

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विद्यापीठात वृक्षारोपण.
आक्रितच! लाख रूपयांना दिवसाला हजार रूपये व्याज!

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये आदर्शगाव योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. याप्रसंगी कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी स्वागत केले. विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधिक्षक मनोज पाटील, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, परिवहन अधिकारी दिपक पाटील, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. महानंद माने, नियंत्रक विजय कोते, मिलिंद ढोके, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे यावेळी उपस्थित होते.

कृषी विद्यापीठातर्फे ७५००० वृक्षांची लागवड पूर्ण

विद्यापीठाच्या दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालयात या वनमहोत्सव सप्ताहानिमित्त ७५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठ प्रक्षेत्र, पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात, निवाराच्या प्रांगणात, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प-वनशेती, मधवर्ती रोपवाटीका प्रक्षेत्र, कोरडवाहू फळे संशोधन प्रक्षेत्र, उद्यानविद्या विभाग, रोपवाटीका प्रक्षेत्र, वनशेती प्रकल्प, डिग्रसटेकडी येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी उत्स्फुर्तपणे विभागातील प्रक्षेत्रावर वृक्षारोपण केले.(Minister Mushrif will provide funds for Rahuri Agricultural University)

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com