राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

सकाळी 11 वाजता या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam Tv

अकोला - पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार केल्याच्या तक्रारीवरून न्यायालयाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी बच्चू कडू (Bachchu Kadu)यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 28 एप्रिल रोजी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कडून अकोल्यातील सत्र जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने बच्चू कडू यांना 9 मे पर्यंत अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

हे देखील पाहा -

आज या प्रकरणी बच्चू कडू यांच्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. बच्चू कडू यांच्या वतीने ऍड. बी.के. गांधी हे बाजू मांडणार आहेत. सकाळी 11 वाजता या प्रकरणी सुनावणी होणार आहे. दुपारपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Bachchu Kadu
"मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर राणा दाम्पत्या विरोधात निवडणूक लढवतो"

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पुंडकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. दरम्यान सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com