बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांची आता खैर नाही, गृहराज्यमंत्र्यांनी दिला 'हा' इशारा

"बेदकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी"
shambhuraj desai
shambhuraj desaiSaam TV

रश्मी पुराणीक

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या (Traffic rules) वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ (RTO), स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक कारवाई करावी. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे. तसेच ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज दिले. बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

shambhuraj desai
अवैध गर्भपात प्रकरण; आरोपी महिलेचा मृतदेह आढळला

या बैठकीला आमदार महेश शिंदे, गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे, परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतुकीची शिस्त बिघडते. त्यामुळे वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे, अपघात होणे, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास,विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे, यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी. बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी. यामुळे महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल.

shambhuraj desai
कोरोनाने टेन्शन वाढवलं! देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत तब्बल ४१ टक्क्यांनी वाढ

उपलब्ध मनुष्यबळातून दैनंदिन नियोजन करावे. राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा,यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या. या महामार्गावरील पोल 36 ते 45 पर्यंत रात्री होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिव्यांच्या खांबांची तसेच इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महामार्गावर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अडचणी सोडवूच, परंतु मानवनिर्मित अडचणींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

Edited by - Naresh shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com