NCP अंतर्गत वादात गुंतली, सगळा प्रकार स्क्रिप्टेड; BJP च्या केंद्रीय मंत्र्यांचा दावा

अजयकुमार मिश्रा यांनी जलमंदिर पॅलेस येथे भवानी मातेचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
ajaykumar mishra, ncp, sharad pawar
ajaykumar mishra, ncp, sharad pawar saam tv

Satara News : राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यांना स्क्रीप्ट नुसार नाटक करावं लागते. मी कोणत्याही व्यक्तीवर, नेत्यावर आणि पक्षावर टीका करत नाहीये. परंतु लाेकांना सर्व समजते. आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपला लाेक साथ देतील असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सातारा येथे व्यक्त केला. (Maharashtra News)

ajaykumar mishra, ncp, sharad pawar
Ajit Pawar यांना चिमटा... व्यंगचित्र पुर्ण हाेताच Raj Thackeray म्हणाले, पुढं काय लिहू गप्प बसा (पाहा व्हिडिओ)

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांनी जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, अशी सूचना मिश्रा यांनी अधिका-यांनी केली.

ajaykumar mishra, ncp, sharad pawar
Maratha Vanvas Yatra सुरु, मराठा क्रांती ठोक माेर्चाने दर्शविला विराेध; तुळजापूरात तणाव

त्यानंतर मिश्रा यांनी फाशीचा वड येथे हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित हाेते.

मिश्रा यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सातारा जिल्ह्यात भाजप तळागळात पाेहचले आहे. एकेकाळी हा राष्ट्रवादीचा गड हाेता आता ताे राहिला नाही असे म्हटलं. ते म्हणाले राष्ट्रवादी स्वत:च्याच भांडणात गुंतली आहे. त्यांना स्क्रीप्ट नुसार नाटक करावं लागतं. मी कोणावर टीका करत नाही मात्र भारतीय जनता पार्टी हि सातारा जिल्ह्यात मजबुत झालेली आहे. येणा-या काळात जिल्ह्यातील लोकसभा आणि सर्व विधानसभेच्या जागा आम्ही जिंकु असा विश्वास असल्याचे मिश्रा यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com