Sanjay Rathod : जो कुणी माझी बदनामी करेल त्याला..., मंत्री बनताच राठोडांनी दिला इशारा

आपल्यावरील झालेल्या आरोपावर बोलताना त्यांनी टीकाकारांना चांगलंच फटकारलं.
sanjay rathod news
sanjay rathod news saam tv

नागपूर : राज्यातील नव्या सरकारचा (Eknath Shinde) मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यवतमाळचे आमदार संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आज पहिल्यांदा त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहेत. तत्पुर्वी त्याचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी आपल्यावरील झालेल्या आरोपावर बोलताना त्यांनी टीकाकारांना चांगलंच फटकारलं. (Sanjay Rathod Latest News)

sanjay rathod news
Maharashtra Politics : ...तर शिंदे शहीदच झाले असते; दीपक केसरकर काय म्हणाले? वाचा...

काय म्हणाले संजय राठोड?

नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. 'हे शक्तिप्रदर्शन नाही तर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, असं सांगत चित्रा वाघ यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मात्र आपल्याला क्लीन चिट मिळालीय, तरी आपली बदनामी केली जात आहे, त्यामुळं कायद्याने त्यांना उत्तर देऊ' असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला सन्मान असल्याचंही राठोड यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंबद्दल जे ट्वीट संजय शिरसाठ यांच्याकडून पडलं होतं, ते चुकून पडलं असल्याचं स्पष्टीकरण राठोडांनी दिलं. खातेपाटप आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी निवड लवकरच करण्यात येणार आहे, त्याचबरोबर कुणाला कोणतं मंत्रिपद दिलं जाईल ते मुख्यमंत्री ठरवतील असं त्यांनी सांगितलं. (Sanjay Rathod Todays News)

दरम्यान, मंत्री संजय राठोड हे मंत्री झाल्यावर आज पहिल्यांदा त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहेत. नागपूरात विमानतळावर त्यांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. त्यानंतर ते यवतमाळ साठी रवाना झाले. कळंब येथील चिंतामणी गणेश मंदिरात दर्शन घेतल्यावर त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com