MahaJyoti : 'महाज्योती' ची बदनामी करू नका - मंत्री विजय वडेट्टीवार

विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपक्रमासाठी वापरला जाणारा निधी शेतकऱ्यांकडे वळविला जातोय, असा आरोप होत आहे. मात्र हे सर्व आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज खोडून काढले आहेत.
MahaJyoti : 'महाज्योती' ची बदनामी करू नका - मंत्री विजय वडेट्टीवार
MahaJyoti : 'महाज्योती' ची बदनामी करू नका - मंत्री विजय वडेट्टीवार Saam TV

यवतमाळ : 'महाज्योती' च्या माध्यमातून राज्यात 16 हजार 165 एकर वर करडईची पिकाची लागवड करण्यात आली आहे. आणि यावरूनच 'महाज्योती' वर आरोप होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपक्रमासाठी वापरला जाणारा निधी शेतकऱ्यांकडे वळविला जातोय, असा आरोप होत आहे. मात्र हे सर्व आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज खोडून काढले आहेत.

MahaJyoti : 'महाज्योती' ची बदनामी करू नका - मंत्री विजय वडेट्टीवार
"प्रत्येक कामाचा एक टक्का घेतो", भ्रष्ट अभियंत्याचा Video पुढे, बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

महाज्योतीच्या (Mahajyoti) उद्देशिकेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी उपक्रम राबविण्याचा समावेश आहे. त्यामुळं सात जिल्ह्यातील कोरडवाहू 6 हजार 949 शेतकऱ्यांना करडई तेलबियाचं मोफत बियाणे देण्यात आले होते. 16 हजार 162 एकरवर या करडईची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. करडई तेलाला मोठी मागणी आणि चांगला भाव आहे. त्यामुळं यातून कोरडवाहू शेतकरी संपन्न व्हावा, हा महाज्योती चा उद्देश असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

हे देखील पहा -

या माध्यमातून तेलबिया उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन केलं जातंय, यातून शेतकरी आणि त्या माध्यमातून ओबीसी (OBC) तरुणांना ही रोजगार मिळेल, असं वडेट्टीवर यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांसाठी जेईई आणि नीट (JEE and NEET) परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे, पायलट प्रशिक्षण याशिवाय इतर उपक्रम राबविण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com