नात्याला काळिमा! सावत्र मामाकडून अल्पवयीन भाचीवर तीन वेळा बलात्कार

औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र मामाने सतत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली
नात्याला काळिमा! सावत्र मामाकडून अल्पवयीन भाचीवर तीन वेळा बलात्कार
Aurangabad CrimeSaam Tv

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र मामाने सतत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने पोलिसात तक्रार दिली आहे. या संपातजनक घटनेमुळे औरंगाबाद हादरुन गेले आहे. औरंगाबादच्या उस्मानपुरा (usmanpur) पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र मामाने बलात्कार (sexual assualt) केले आहे. ३ वेळेस सतत बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. (Aurangabad Crime News)

हे देखील पाहा-

पीडित मुलगी अत्याचारानंतर खूप घाबरलेली होती. तिचे रडणे बघून मुलीच्या वडिलांनी तिला आजीकडे जाण्यास सांगितले होते. तेव्हा हे सर्व धक्कादायक प्रकार मुलीने आपल्या आजीला आणि सावत्र भावाला सांगितला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेच्या आजीने पोलीस स्टेशन गाठले आणि सावत्र मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावत्र मामाने आपल्याच १३ वर्षांच्या भाचीवर ३ वेळा बलात्कार केला आहे. ही धक्कदायक घटना २५ एप्रिल दिवशी घडली आहे.

Aurangabad Crime
या 27 शहरांमध्ये लॉकडाऊन लागू; लग्न आणि अंत्यसंस्कारावर बंदी

उस्मानपुरा पोलिसांनी (police) या खळबळजनक घटनेप्रकरणी माहिती दिली आहे. उस्मानपुरामध्ये एक व्यक्ती कुटुंबाबरोबर राहत होती. या व्यक्तीला ४ बायका आहेत. २ पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आणि एक पत्नी सोडून गेल्यावर या इसमान चौथं लग्न केले आहे. पहिल्या पत्नीपासून या इसमाला २ मुले आहेत, तर दुसऱ्या पत्नीपासून २ मुली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चौथ्या पत्नीचा भाऊ घरी आला होता. तेव्हा त्यांने आपल्याच भाचीवर अतिप्रसंग केला आहे. १३ वर्षांच्या चिमुरडीवर त्याने जबरदस्तीने ३ वेळा बलात्कार केला आहे. यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी पूर्णपणे बिथरली होती. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने कुणालाच काही सांगितले नाही. पण झालेल्या त्रासामुळे तिला रडू आवरत नव्हतं. दरम्यान, सध्या या पीडित मुलीवर बलात्कार करणारा तिचा सावत्र मामा फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.