Nagpur Crime: अल्पवयीन मुलीने युट्यूब व्हिडिओ पाहून स्वत:ची केली प्रसूती; नंतर बाळासोबत जे केलं ते भयंकरच...

सध्या अल्पवयीन मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
Nagar, Akole, Sunita Jadhav
Nagar, Akole, Sunita Jadhavsaam tv

Minor Girl : नागपूरमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने युट्यूब व्हिडिओ पाहून स्वत: घरामध्येच स्वत:ची प्रसूती केली आहे. इतकच नाही तर या मुलीने आपलं बाळ रडू नये यासाठी मोठं टोकाचं पाऊल उचललं आहे. बाळ रडल्यावर सर्वांना समजेल या भीतीमुळे मुलीने जवळ असलेल्या पट्ट्याने बाळाचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या अल्पवयीन मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. (Latest Minor Girl News)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नागपूरातील अंबाझारी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. सदर मुलगी ही इयत्ता ९ वी मध्ये शिकत होती. गेल्या वर्षी ठाकूर नामक युवकाशी तिची सोशल मीडियावर ओळख झाली. या मुलीच्या घरी ती आणि तिची आई अशा दोघीच मायलेकी राहतात. आई एका खासगी कंपनीत काम करते. आई घरी नसताना मुलीचे मित्राशी संबंध वाढले. तसेच ती त्याला भेटू लागली.

Nagar, Akole, Sunita Jadhav
Mumbai Crime: मुंबईत मस्तान गँग सक्रिय; दहशत माजवणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुलीच्या घरी कोणी नसतं याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला दारू पाजली. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. नंतर तरुणाने या मुलीवर बलात्कार केला. तिला शुद्ध आली तेव्हा आपल्याबरोबर चुकीचा प्रकार घडल्याचं तिच्या लक्षात आलं. मात्र तिने घरी या विषयी काहीच सांगितले नाही. मुलीने त्या युवकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. पुढे काही दिवसांनी ती गरोदर राहिली. आईला हे समजल्यावर ती आपल्याला ओरडेल या भीतीने मुलीने घरी काहीच सांगितले नाही.

Nagar, Akole, Sunita Jadhav
Crime Video : अग्निपरीक्षा ! माझे अनैतिक संबंध नाहीत; खरं सांगूनही दिली भयंकर शिक्षा

पुढे काही दिवसांनी तिने युट्यूबवर व्हिडिओ पाहून सर्व माहिती मिळवण्यास सुरूवात केली. प्रसूती कशी होते? कशी केली जाते? अशी सर्व माहिती तिने मिळवली. तसेच यासाठी तिने लागणारे सामान जमा केले. शुक्रवारी दुपारी आई घरी नसताना तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिने युट्यूबवर व्हिडिओ सुरू करत प्रसूती केली आणि स्वत:ची सुटका केली. मात्र यात तिने बाळाचा देखील जीव घेतला. आई घरी आल्यावर तिला मुलीची प्रकृती ठिक नसल्याचे दिसले. तसेच घरात काही ठिकाणी रक्ताचे डागही होते. त्यामुळे आईने कसून चौकशी केली असता मुलीने या बाबत घारी सर्व सांगितले. आईने तिला जवळच्या शासकीय रुग्नालयात दाखल केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com