Beed News: धक्कादायक! आयुर्वेदिक औषधोपचार करण्याच्या बहाण्याने आला, अन् त्यांच्याच मुलीला घेऊन पळाला

Beed Minor Girl Abducted: याप्रकरणी भोंदू महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस (Beed Police) त्याचा शोध घेत आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam Tv

विनोद जिरे, बीड

Beed Police: बीडमध्ये (Beed) एक धक्कादायक घटना घडली आहे. आयुर्वेदिक औषधोपचार (Ayurvedic Treatment) करण्याच्या बहाण्याने आलेल्या भोंदू महाराजाने (Bhondu Maharaj) एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. याप्रकरणी भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस (Beed Police) त्याचा शोध घेत आहे.

Beed Crime News
Sameer Wankhede Expressed Fear: अतीक अहमदसारखा माझ्यावर हल्ला होऊ शकतो, समीर वानखेडेंनी व्यक्त केली भीती

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका आजारी व्यक्तीवर आयुर्वेदिक औषधोपचार करण्यासाठी एक भोंदू महाराज आला होता. अल्पवयीन मुलगी आपल्या आजारी वडिलांची देखभाल आणि सेवा करत होती. ही मुलगी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. त्याच वेळी या भोंदू महाराजाने फूस लावून तिला पळवून नेले.

Beed Crime News
Pandharpur Accident News: देवदर्शनानंतर घरी निघाले, वाटेत काळाचा घाला; ३ भाविक जागीच ठार, ७ जखमी

भोंदू महाराज या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून पळून गेला. ही घटना अल्पवयीन मुलीच्या काकाने पाहिली. त्यांनी या भामट्या महाराजाचा पाठलाग करुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते कुठेच दिसले नाही. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी युसुफवडगाव येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी माऊली धोंडीराम भोसले या भामट्या महाराजाविरोधात गुन्हा दाखल केला. या महाराजाचा आणि मुलाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com