Brahmanand Padalkar : पडळकर गटास धक्का, ब्रह्मानंद पडळकर अडचणीत (पाहा व्हिडिओ)

आगामी काळात मिळकतदार नुकसान भरपाईसाठी लढा उभारणार आहेत.
Brahmanand Padalkar
Brahmanand Padalkarsaam tv

Brahmanand Padalkar : मिरजेतील (miraj) वादग्रस्त जागेवर मिळकतदारांचाच कब्जा राहणार असल्याने आज मिळकतदारांमध्ये आनंदाचे वातावरण हाेते. दरम्यान भाजप आमदार गाेपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांच्या विराेधात न्याय दंडाधिका-यांनी हा निकाल लागला आहे. त्यामुळे पडळकर गटास हा दणका मानला जात आहे.

Brahmanand Padalkar
Nilesh Rane : गाेट्या सावंतांचा जीव गेला असता, वैभव नाईक पळपुटा आमदार; कणकवलीतील राड्यावर निलेश राणेंचा धक्कादायक दावा

गेल्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या मिरजेतील (miraj) वादग्रस्त जागेबाबत आज तहसीलदार दगडू कुंभार यांनी निकाल दिला. पाडकाम झालेली जागा ही मिळकतदारांच्याच कब्जात असल्याचे कागदपत्रे तपासणीनंतर समोर आले. त्यानूसार तहसीलदार दगडू कुंभार यांनी मिळकतदारांच्या बाजूने निकाल दिला आहे अशी माहिती मिळकतदारांचे वकील ए.ए.काजी यांनी दिली. (Maharashtra News)

Brahmanand Padalkar
Vitthal Rukmini Wedding Ceremony : विठ्ठल-रुक्मिणीचा उद्या शाही विवाह सोहळा; बंगळूरहून आला पाेषाख

दरम्यान या निकालाबाबत न्यायालयात (court) दाद मागण्याची मुभा पडळकरांना देण्यात आलेली आहे. आजच्या निकालाने वादग्रस्त जागेबाबतची सुरू असलेली चर्चा आता थांबेल अशी आशा आहे. आगामी काळात पडळकर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मिळकतदारांच्या मिळकती पाडण्याचा प्रयत्न केला व कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याने पुढील लढाई लढून नुकसान भरपाई मागणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com