Amol Mitkari : आमदार अमोल मिटकरींचा पोलीस ठाण्यात ठिय्या; त्या गुंडावर कारवाई करण्याची मागणी, काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी रात्री तासभर रामदासपेठ पोलीस ठाण्यात ठिय्या दिलाय.
Amol Mitkari News
Amol Mitkari NewsSaam TV

Mla Amol Mitkari News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी रात्री तासभर रामदासपेठ पोलीस ठाण्यात ठिय्या दिलाय. एका गुंडाने एका तरुणाच्या दोन बहिणींवर बलात्कार करण्याची धमकी दिल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आमदार मिटकरींनी पोलीस स्टेशन सोडलं. (Latest Marathi News)

Amol Mitkari News
Unique Marraige : आधी करार मग लग्न! खेडमध्ये ६ अटींवर पार पडला आगळावेगळा लग्न सोहळा

काय आहे प्रकरण?

अकोल्यातील (Akola) एका गुंडाने त्याच्याविरूद्ध तक्रार करणाऱ्या तरूणाच्या दोन बहिणींवर बलात्काराची धमकी दिली. सोहेल खान असं या गुंडाचं नाव आहे. तो अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोमिनपुरा भागातील रहिवाशी आहे.

आज याविरूद्ध जाब विचारण्यासाठी रात्री आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी धमकी मिळालेल्या कुटूंबासह थेट रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

चार दिवसांपुर्वी आरोपी सोहेल खान नामक गुंडाने एका टायपिंग इन्स्टीट्युटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कोणताही वाद आणि कारण नसतांना भोसकलंय. जखमी विद्यार्थ्यावर सध्या जिल्हा रूग्णायलात उपचार सुरू आहेत.

Amol Mitkari News
Nanded-Pune Highway : आता नांदेड ते पुणे अवघ्या साडेतीन तासांत गाठता येणार; गडकरींनी सांगितला फ्यूचर प्लान

या घटनेनंतर रामदासपेठ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा (Crime News) दाखल केलाय. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर आरोपी सोहेलने विद्यार्थ्याच्या आईला धमकी दिलीय. यात त्याने जखमी विद्यार्थ्याच्या अकोल्यात शिकत असलेल्या दोन्ही बहिणींवर बलात्काराची धमकी दिली.

याच प्रकरणी आमदार मिटकरींनी रात्री तब्बल तासभर रामदासपेठ पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आमदार मिटकरींनी पोलीस स्टेशन सोडलं. आरोपी गुंड सोहेल खानला रामदासपेठ पोलिसांचं अभय असल्याचा आरोप त्यांनी केला. या धमकीनंतर देखील या गावगुंडावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com