बीडच्या रेल्वेसाठी राज्य सरकार देणार 50 टक्के निधी; धनंजय मुंडेंनी मानले आभार

धनंजय मुंडे यांनी संबंधित विभागाचे आभार मानले आहेत.
Dhananjay Munde Beed Railway
Dhananjay Munde Beed RailwaySaam TV

बीड : अनेक वर्षांपासून बीडकरांच्या (Beed) जिव्हाळ्याचा आणि डोळ्यासमोर असणाऱ्या रेल्वेच्या प्रश्नावर, राज्य सरकारने मोठा शासन निर्णय काढलाय. आता केंद्र सरकार बरोबर राज्य सरकार देखील बीडच्या रेल्वेसाठी (Railway) 50% हिस्याचा निधी देणार आहे. यामुळे बीडकरांच्या रेल्वे विषयीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. (Beed Latest News)

Dhananjay Munde Beed Railway
Jalna News : बायको माहेरी गेली, परत आणा; जालन्यात चक्क टॉवरवर चढला नवरा

हा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या बैठकीत हा निर्णय झाला होता, तो कायम करत त्याचा शासन निर्णय काढण्यात आलाय. असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी, ट्विट करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत. रेल्वे बोर्डाच्या सुधारित अंदाजपत्रकात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या सुधारित 4805.17 कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती.

30 जून, 2022 रोजी झालेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत, या रेल्वे मार्गाचा 50% राज्य हिस्सा म्हणजेच 2402.59 कोटी रुपये सुधारित आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने केंद्राच्या निधी वितरणाच्या सम प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. (Dhananjay Munde News)

Dhananjay Munde Beed Railway
Beed : कोद्री नदीच्या पुलावरून टॅंकर काेसळला; चालक सुखरुप

त्यानंतर आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालंय. या सरकारने महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. मात्र, बीडकरांसाठी महत्त्वाचा मानला जाणार हा निर्णय कायम ठेवत, त्याचा शासन निर्णय जारी केलाय.

बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या भावनांशी जोडलेला हा रेल्वे मार्ग पूर्ण व्हावा. यासाठी 2402 कोटी रुपये या रेल्वे मार्गास उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय स्वागतार्ह असून यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी अनेक वेळा आग्रहाची मागणी केली होती. असं म्हणत धनंजय मुंडे यांनी संबंधित विभागाचे आभार मानले आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com