आमदार मेघना बोर्डीकरांनीही चिखल रस्त्यावर चालून पिंप्राळा ग्रामस्थांच्या घेतल्या व्यथा जाणून

तालुक्यातील पिंप्राळा या आदिवासी लोकवस्तीच्या गावापासून राज्यरस्त्याला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने रस्त्याअभावी गावकऱ्यांची मोठी गैरसोय होताहे
आमदार मेघना बोर्डीकरांनीही चिखल रस्त्यावर चालून पिंप्राळा ग्रामस्थांच्या घेतल्या व्यथा जाणून
आमदार मेघना बोर्डीकर

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील पिंप्राळा येथील तीन किलोमीटर चिखल तुडवत पायी चालून आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी या रस्त्याचा अनुभव घेतला. यावेळी ग्रामवासीयांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या.

तालुक्यातील पिंप्राळा या आदिवासी लोकवस्तीच्या गावापासून राज्यरस्त्याला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने रस्त्याअभावी गावकऱ्यांची मोठी गैरसोय होताहे. पावसाळ्यात तर कच्च्या रस्त्यावरील दलदलीमुळे गावाबाहेर जाणे कठीण होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण यांचे हाल होतात. आपत्कालीन परिस्थितीत आजारी व्यक्तींना उपचारासाठी शहरात नेण्याकरिता कसरत करावी लागते. प्रसंगी गंभीर रुग्णाला जीव गमवावा लागतो. दोन आठवड्यापूर्वी एका गरोदर मातेला माळरानात बाळंत होण्याची वेळ आली होती. चार दिवसापूर्वी (ता. ११) गावातील पार्वतीबाई ढाकरे या वृध महिलेला अर्धांगवायू झाला तेंव्हा उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर पोहचू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- लग्नानंतर ३ महिन्यांतच आई बनली दिया मिर्झा

अशा घटनांमुळे मागील वर्षभरापासून येथील रस्त्याचा प्रश्न जिल्ह्यात चर्चिला जात आहे. लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमांनीही सातत्याने हा प्रश्न मांडला. अखेर आमदार साकोरे- बोर्डीकर यांनी लोकभावनेची दखल घेऊन मंगळवारी (ता. १३) सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्यारचा चिखल तुडवत पायी चालून गावास भेट देऊन गावातील हनुमान मंदिरासमोर गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मुख्य रस्त्यासह इतर समस्या जाणून घेऊन या रस्त्याचा प्रश्न जिल्हा परिषद स्तरावरील असलातरी तो सोडवण्यासाठी व्यक्तीशः प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

आता या आश्वासनाची पूर्तता कधी होईल याकडे त्यांचे लक्ष असून दोन आठवड्यात ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा उलगुलान आंदोलन करण्याची गावकऱ्यांची तयारी असल्याचे आमदाराच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार बोर्डीकरांसोबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एल. मोरे, विस्तार अधिकारी शिवराम ढोणे व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com