आमदार मोनिका राजळेंची शेवगावच्या तहसीलदारांविरोधात तक्रार
Mla Monika Rajale

आमदार मोनिका राजळेंची शेवगावच्या तहसीलदारांविरोधात तक्रार

सचिन सातपुते

शेवगाव : तालुक्यातील विविध प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी आढावा बैठक घेतली; मात्र तहसीलदार बैठकीस उपस्थित न राहिल्याने आमदार राजळे यांनी त्याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार केली.

लांबलेल्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची स्थिती, तालुक्यातील आरोग्य सुविधा, लसीकरण, भविष्यातील कोरोना संदर्भातील उपाययोजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, महसूल व इतर विभागांतील प्रलंबित कामे यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविली होती.(MLA Monika Rajales complaint against Shevgaon tehsildar)

Mla Monika Rajale
नेवाशात मुरकुटे झाले सक्रिय, गडाखांनी मोठा हात मारलाय

प्रांताधिकारी देवदत्त केकाण बैठकीस उपस्थित होते. मात्र, तहसीलदार अर्चना भाकड बैठकीस अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपवून मुंबई येथून थेट बैठकीसाठी आलेल्या आमदार राजळेंचा पारा चढला. या वेळी तहसीलदार नगरला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीस गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत माहिती घेतली असता, अशी कोणतीही बैठक आयोजित केली नसल्याचे समजले.

तालुक्याच्या प्रशासकीय प्रमुख असलेल्या तहसीलदारांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांचे काम आमदारांच्या प्रोटोकॉलपेक्षा व तालुक्यातील प्रश्‍नांपेक्षा महत्त्वाचे वाटले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तहसीलदारांच्या या बेजबाबदार वर्तनाची तक्रार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूलमंत्र्यांकडे करून, योग्य ती कारवाई करण्याचे पत्र त्यांनी तत्काळ दिले. (MLA Monika Rajales complaint against Shevgaon tehsildar)

नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

बैठकीस उपस्थित नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी आमदार राजळे यांच्यापुढे तहसीलदारांच्या तक्रारींचा पाढा वाचला. प्रकरणे प्रलंबित ठेवणे, लोकांना दुरुत्तरे करणे, नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेणे, लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे प्रलंबित ठेवणे, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com