शिवसेनेच्या औटींचे आमदार नीलेश लंकेंबाबत अनेक गौप्यस्फोट

शिवसेनेच्या औटींचे आमदार नीलेश लंकेंबाबत अनेक गौप्यस्फोट
आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेर तालुक्यात माजी आमदार विजय औटी सक्रिय झाले आहेत. कामांची भूमिपूजने करण्यास सुरूवात केली आहे. त्यावेळी ते आमदार नीलेश लंके यांच्यावर टीकास्त्र सोडीत आहेत. तालुक्याचे वाटोळे करायला सुरूवात केल्याचंही ते बोलून दाखवत आहेत. नीलेश लंके यांच्याकडूनही औटींना प्रतिसवाल केला जातोय.

सध्या तालुक्यात जे काही चाललंय, ते पाहून मनात चीड निर्माण होतेय. अनेक लोकं तसेच काही आमदारही या बाबत मला फोन करून ज्या गोष्टी सांगत आहेत, त्यावर तुमचा विश्वास ही बसणार नाही. तरूणांना बिघडविण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी बोचरी टीका आमदार नीलेश लंके यांचे नांव न घेता विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार विजय औटी यांनी केली. (Nilesh Lanke spoiled the younger generation)

आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी
नेवाशात मुरकुटे झाले सक्रिय, गडाखांनी मोठा हात मारलाय

मावळेवाडी येथील तीन कोटी 79 लाख रूपये खर्चाच्या रस्त्याचे औटी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परीषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, रामदास भोसले, विकास रोहोकले, डॉ. श्रीकांत पठारे, नितिन शेळके, राहूल शिंदे, नीलेश खोडदे, सरपंच पंकज कारखिले, सागर मैड, आदी मान्यवर उपस्थित होते.

औटी पुढे म्हणाले, अनेक लोक आपली चूक झाल्याचे माझ्याजवळ कबूल करतात. आपण कशाला समर्थन देतो, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. भविष्य बिघडावयाचे की घडावयाचे याचाही विचार अता लोकांनी करणे गरजेचे आहे. भविष्यात या गोष्टी दुरूस्त काराव्या लागतील, त्या साठी आगामी नगरपंचायत व जिल्हा परीषद पंचायत समितीच्या निवडणुकीत या गोष्टी लक्षात घेऊन त्या प्रमाणे वाटचाल करावी लागेल.

चुकीला समर्थन देऊन किंवा वागून चालत नाही. सरकारी नियमांचे पालन न करणे म्हणजे मोठेपणा नाही. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असावी. मी जर आमदार असतो तर सरकारी यंत्रणेच्या पाठिशी खंबीर उभे राहून कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करीत किमान 50 टक्के जीव वाचविले असते. (Nilesh Lanke spoiled the younger generation)

निवडणुकीत घेतलेले दोन लाख किती दिवस पुरतील

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लाख दोन लाख घेऊन आता मात्र त्यांच्यावर तोंड लपविण्याची वेळ आलीय. ते पैसे आयुष्यभर पुरणार नाहीत. अता त्यांच्यावर भामटे होण्याची वेळ आलीय. पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहिले असते तर आज उजळ माथ्याने त्यांना फिरता आले असते, असा गौप्यस्फोट करीत जिल्हा बँक निवडणुकीत गद्दारी करणारांनाही चांगलेच फटकारले.

आज मीच मंत्री असतो

तालुक्यात सलग 15 वर्षे आमदार राहण्याची संधी फक्त मलाच जनतेने दिली. आज मी आमदार असतो, तर मी मंत्रीच असतो. यात काही शंका नाही. कार्यकर्तेसुद्धा सत्तेच्या मागे पळतात. त्यांनाही थांबायला वेळ नाही. त्यांना माहित नव्हते की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com