आमदार लंकेंचे सल्लागारच कायद्याच्या कचाट्यात, अॅट्रॉसिटी दाखल

आमदार लंकेंचे सल्लागारच कायद्याच्या कचाट्यात, अॅट्रॉसिटी दाखल
क्राईम न्यूज

अहमदनगर : आमदार नीलेश लंके हे यांच्याकडे तालुक्याची सूत्र आल्यापासून राजकीय गणित बदलले आहे. मागील पंधरवड्यात लंके विरूद्ध तहसीलदार ज्योती देवरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मनसे कार्यकर्त्यानेही लंके यांच्यावर आरोप लावले होते. या प्रकरणात अॅड. राहुल झावरे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले होते. लंके यांच्या कोणत्याही मोहिमेत झावरे हे अग्रभागी असतात. कायदेशीर बाबी झावरे हेच पाहतात. आता तेच कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. यात राजकारण असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.MLA Nilesh Lankes supporter charged with atrocity abn79

वनकुटेतील सरपंच अॅड. राहुल झावरे यांच्याकडे येडूमाता मंदिराचा सभामंडप मंजूर झाला आहे, त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी सरपंच झावरे यांनी मला जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली, अशी फिर्याद मिनीनाथ सूर्यभान बर्डे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली.

क्राईम न्यूज
आमदार रोहित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करा...भाजपच्या 'या' नेत्याची मागणी

बर्डे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की मला येडूमाता मंदिर सभामंडपासाठी ग्रामपंचायतीचा ठराव हवा होता. मी तो सरपंचांकडे मागितला, त्यावेळी झावरे यांनी, मी दशक्रिया विधीसाठी येणार आहे. तू तेथे ये, असे सांगितले. त्या वेळी मी व गावातील प्रल्हाद पवार, नाथा बर्डे त्यांच्याकडे गेलो. सरपंचांकडे येडूमाता मंदिराला सभामंडप मंजूर झाला असून, त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीचा ठराव द्यावा अशी मागणी केली. त्यावर त्यांनी, तुला काय करायचे ते कर, तुला सांगितलेले कळत नाही का, असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. MLA Nilesh Lankes supporter charged with atrocity abn79

मी बर्डे यांना मारहाण किंवा शिवीगाळही केली नाही. ही फिर्याद त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून, तसेच दबावापोटी दिली असावी. यातील त्यांनी कथन केलेला सर्व प्रकार खोटा आहे. केवळ राजकीय आकसातून ही फिर्याद दिली आहे.

- अॅड. राहुल झावरे, सरपंच, वनकुटे

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com