'या' आमदारानं Facebook Live करुन मुख्यमंत्र्यांसमोर मांडली व्यथा

ही केवळ विरोधी पक्षातील आमदारांची हाक नाही तर सर्वपक्षीय आमदारांची हीच व्यथा असल्याचं आमदार प्रशांत बंब यांनी Facebook Live करुन म्हटलं आहे.
'या' आमदारानं Facebook Live करुन मुख्यमंत्र्यांसमोर मांडली व्यथा
'या' आमदारानं Facebook Live करुन मुख्यमंत्र्यांसमोर मांडली व्यथाSaam Tv News

औरंगाबाद - मुख्यमंत्री साहेब आमदारांना तरी वेळ द्या, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत बंब (BJP MLA Prashant Bamb) यांनी केलीय. ही केवळ विरोधी पक्षातील आमदारांची हाक नाही तर सर्वपक्षीय आमदारांची हीच व्यथा असल्याचं आमदार प्रशांत बंब यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) अनेक पत्रे पाठवून साधा प्रतिसाद दिला जात नाही, आमदारांचे ऐकले जात नाही, त्यामुळे कोरोना काळात अधिकारी ऐकत नाहीत, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय, असा आरोप करीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी थेट फेसबुक लाईव्ह (Facebook Live) वरून मुख्यमंत्र्यांना विनवणी केलीय. (MLA prashant bamb express himself on facebook live about CM)

मुख्यमंत्रिपदाचा पदभार घेऊन आपणास पावणे दोन वर्षे उलटली आहेत. पण, या कालावधीत आपण विरोधी पक्षांच्या आमदारांना वेळ दिलेला नाही. कोरोना संकट, विविध खात्यांत बोकाळलेला भ्रष्टाचार, शेतकरी हिताच्या योजना या विषयांवर आपणाशी चर्चा करायची आहे, त्यामुळे किमान ऑनलाइन तरी वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीये. आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फेसबुकवरून संवाद साधल्यानंतर त्यांची व्यक्तीगत अडचण असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिलीय. ही व्यथा केवळ विरोधी पक्षातील आमदाराची नाहीतर सर्वपक्षीय आमदारांची असल्याचं बंब यांचं म्हणणं आहे.

'या' आमदारानं Facebook Live करुन मुख्यमंत्र्यांसमोर मांडली व्यथा
मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्यात विकासकामे करायची असोत की नैसर्गिक संकटे, कोरोना सारख्या महामारीचा सामना करायचा असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे आमदार प्रशांत बंब म्हणाले. विविध खात्यांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यांत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार होत आहे. पुराव्यानिशी आम्ही तक्रारी केल्या, पण त्याचा खुलासा केला जात नाही. जर हे खोटे निघाले तर मी राजीनामा देईन असही प्रशांत बंब म्हणालेत. त्यामुळे आता प्रशांत बंब यांनी मांडलेली भूमिका आणि केलेली मागणी मुख्यमंत्री मनावर घेतात का आणि आमदारांशी संवाद साधतात का हे पाहावे लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com