MLA Ranjit Kamble: 'इंडिया' आघाडीला घाबरून देशाचं नाव बदलण्याची तयारी'; काँग्रेस आमदाराचा मोदी सरकारवर आरोप

Mla ranjit Kamble: 'इंडिया' आघाडीला घाबरून मोदी सरकारची देशाचं नाव बदलण्याची तयारी सुरू आहे, असा आरोप आमदार रणजित कांबळे यांनी केला आहे.
MLA Ranjit Kamble:
MLA Ranjit Kamble:Saam tv

चेतन व्यास

Mla Ranjit Kamble on India Vs Bharat Row

देशात गेल्या काही दिवसांपासून इंडिया विरुद्ध भारत असा नावाचा वाद सुरु झाला आहे. जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिंडेट ऑफ भारत असा उल्लेख होता. तर परिषदेतील पंतप्रधान मोदींच्या नावाच्या फलकावर भारत असा उल्लेख होता. यामुळे चर्चांना वेग आला आहे. आता यावरून काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

'इंडिया' आघाडीला घाबरून मोदी सरकारची देशाचं नाव बदलण्याची तयारी सुरू आहे, असा आरोप आमदार रणजित कांबळे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

वर्ध्यातील सेवाग्राम येथे काल काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप झाला. या यात्रेच्या सभेत आमदार रणजित कांबळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

MLA Ranjit Kamble:
INDIA Meeting Update : 'इंडिया' आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आज ठरणार? शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

रणजित कांबळे म्हणाले, 'देशात पंतप्रधान मोदी यांचं अहंकारी सरकार येण्यापूर्वी सत्तर वर्षात भारतावर ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज होतं, पण २०१४ ते आतापर्यंत हे कर्ज १०० लाख कोटीने वाढून १५५ लाख कोटीपर्यंत गेलं आहे'

'एकीकडे देशावर वाढत कर्जाचं डोंगर, महागाई, बेराजगारीने जनता त्रस्त झाली आहे. या मोदी सरकारला धडा शिकवण्यासाठी देशातील 28 राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. २८ पक्षांनी पुढील लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यासाठी आघाडी बनवली आहे. या आघाडीला इंडिया असं नाव दिलंय, असे ते म्हणाले.

'इंडिया आघाडी तयार होताच केंद्र सरकार घाबरली आहे. आता देशाच्या नावात 'इंडिया'ऐवजी भारत हा शब्द वापरावा असा प्रयत्न सुरु आहे. या सरकारच्या लक्षात आले आहे की इंडिया आघाडीकडे देशातील 67 टक्के मतांचा हिस्सा आहे, तर एनडीएकडे 33 टक्के असल्याने घाबरून हा प्रयत्न सुरु आहे, असा दावा कांबळे यांनी केला आहे.

MLA Ranjit Kamble:
Barsu Refinery: कोकणातील बारसू प्रकल्पावर मोठी अपडेट; अरेबियाचे राजकुमार -PM मोदींमध्ये नेमकी चर्चा काय?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com