Shivsena Bhavan : शिंदे गट शिवसेना भवनावरही कब्जा करणार? रवी राणांचं मोठं विधान; म्हणाले, येणाऱ्या १५ दिवसांत..,

अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेना भवनाबाबत एक मोठं विधान केलं आहे.
Mla Ravi Rana Reaction On Election Commissions Result
Mla Ravi Rana Reaction On Election Commissions ResultSaam TV

अमर घटारे, साम टीव्ही

Mla Ravi Rana Reaction On Election Commissions Result : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेना भवनाबाबत एक मोठं विधान केलं आहे. येणाऱ्या 15 दिवसात शिवसेना भवन सुद्धा एकनाथ शिंदेच्या ताब्यात राहील, त्या ठिकाणी शिंदे बसतील. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे सोबत आहे, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे. (Political News)

Mla Ravi Rana Reaction On Election Commissions Result
Maharashtra Politics : ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी; आदित्य ठाकरेंसह १५ आमदारही अपात्र ठरणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले आमदार रवी राणा?

येणाऱ्या १५ दिवसात शिवसेना भवन सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात राहील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी बसतील अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोबत आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त सच्चे शिवसैनिक शिंदेंच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे त्यांचं बहुमत सिद्ध होत आहे. येणारा काळात उद्धव ठाकरे सोबत फक्त अनिल परब, संजय राऊत,आणि आदित्य ठाकरे हे तिघंच जण राहतील, असा टोला सुद्धा रवी राणा यांनी लगावला आहे.

Mla Ravi Rana Reaction On Election Commissions Result
Ujjwal Nikam : उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पुन्हा मिळू शकतो का? उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं

'उद्धव ठाकरेंना महाशिवरात्रीचा प्रसाद मिळाला'

दरम्यान, रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा शिंदे गटाचं अभिनंदन करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना महाशिवरात्रीचा प्रसाद मिळाला आहे. जो रामाचा नाही, हनुमानाचा नाही, तो कोणत्या कामाचा नाही आणि धनुष्यबाण त्यांचा नाही, अशी खरमरीत टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

एक व्यक्ती चुकीचा होता म्हणून बाकी सर्व लोक पक्षाबाहेर निघाले, १२ खासदार ४० आमदार बाळासाहेबांच्या विचारावर काम करणारे नेते आहेत. ज्यांनी दिवस-रात्र सतरंज्या उचलून शिवसेना निर्माण केली ते सर्व लोक बाहेर पडले, बाळासाहेबांनी आधी सांगितलं होतं की मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबातला कधीच होणार नाही. तो पक्षाचा व्यक्ती राहील मात्र उद्धव ठाकरे यांना सत्तेचे आणि खुर्चीची लालसा लागली होती त्यांनी पूर्ण विचारधारा सोडून दिली होती, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com