औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून सभेची सुरुवात करणार का?; राणांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Ravi Rana : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने सुद्धा एक महाविराट सभा आयोजित केली आहे
औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून सभेची सुरुवात करणार का?; राणांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Ravi RanaSaam Tv

मुंबई : राज्यात एकीकडे भोग्यांवरून राजकारण तापलं असतानाच दुसरीकडे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (akbaruddin owaisi) यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद (Kultabad) येथील कबरीचे दर्शन घेतले. ओवैसी हे गुरुवारी औरंगाबादेत (Aurangabad) आले आणि त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला (Aurangzeb Tomb) भेट दिली आणि कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणानंतर विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपासहीतच सत्ताधारी शिवसेनेनंही ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. अशातच आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Mla Ravi Rana) यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Ravi Rana
"औरंगजेबाला याच मातीत गाडलं; आता त्याच्या भक्तांनाही"..., संजय राऊतांचा इशारा

आमदार रवी राणा सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीमधून या प्रकरणासंदर्भात त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackarey) निशाणा साधा आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजेंच्या विचारांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात संभाजी नगर येऊन ओवेसी फुलं वाहतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत ती कबर कोणी उघडली, तिथं फुलं वाहिली हे मी फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पाहिलेलं आहे,” असं राणा म्हणालेत.

पुढे बोलताना त्यांनी स्वत:वर आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांच्याविरोधात राज्य सरकारने हनुमान चालिसा प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याची आठवण करुन दिली. "हनुमान चालीसा पठण केल्याने आम्हाला तुरूंगात टाकले जाते पण ओवेसी महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता देशातील प्रत्येक हिंदूचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, तुम्ही खरे हिंदूंचा असाल तर उद्याच्या सभेची (शनिवार 14 मे) सुरुवात उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचून करणार? की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून करणार" ? असा थेट सवाल आमदार रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Tahckarey ) आणि त्यापाठोपाठ भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या सभांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या सभांमधून प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने सुद्धा एक महाविराट सभा आयोजित केली आहे. शनिवार, दिनांक 14 मे रोजी बी.के.सी मैदानावर ही सभा होणार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.