Sanjay Gaikwad News : 'संजय राऊत एक रिकामटेकडा माणूस'; शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांचा जोरदार घणाघात

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे
Sanjay Gaikwad News
Sanjay Gaikwad NewsSaam tv

संजय जाधव

Sanjay Gaikwad News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'संजय राऊत हा एक रिकामटेकडा माणूस आहे. त्यांच्याकडे कुठलेही काम नाही. मराठा समाजाच्या निघालेल्या लाखोंच्या मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून टिंगल केली होती, अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. (Latest Marathi News)

Sanjay Gaikwad News
Maharashtra Politics : संजय राऊतांच्या धमक्यांमुळेच आमदार पळाले; शिंदे गटाने लेखी उत्तरात काय म्हटलं? वाचा...

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुढे म्हणाले, 'सध्या राज्यात आणि देशांमध्ये जे हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत आहेत, ते गोमातेच्या रक्षणासाठी आहेत. दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून आपल्या देशामध्ये लव्ह जिहाद जो हैदोस घालतो आहे. लाखो मुलींचे धर्मांतर त्या ठिकाणी करतो आहे. त्याच्या विरोधात धर्मांतर बंदी कायदा आणण्यासाठी हे मोर्चे निघत आहेत. अनेक राज्यांनी हा कायदा केला. संपूर्ण देशात हा कायदा करण्यात यावा, हा कायदा आपल्या हिताचा आहे. या मोर्चांवर टिंगल टवाळी करणं म्हणजे त्या हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम करणाऱ्या संजय राऊतांची (Sanjay Raut) दिवाळखोरी निघाल्याचे दिसत आहे'.

दरम्यान, संजय गायकवाड यांनी खासदार अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. 'ऑन मेरिट खासदार आणि आमदारांची संख्या लक्षात घेता ,निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच देईल .कारण निवडणूक आयोगाने या वादावर तोडगा काढण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना हे एक नाव , प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना हे दुसरं नाव ,आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिसरं नाव . अशा तीन नावांपैकी ठाकरे गटाला सांगितलं की , तुम्हाला कुठलं नाव चालतं? त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना घेतलं नाही, असे संजय गायकवाड म्हणाले.

Sanjay Gaikwad News
Thackeray VS Shinde News : ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी उत्तर सादर; कोणी काय म्हटलं? वाचा...

'त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव घेतलं , आणि धनुष्यबाण हे जे चिन्ह घेतलं होतं ते बाळासाहेबांनी घेतलं होतं . ती बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला भेटल्यामुळे त्यांना त्या चिन्हावर हक्क सांगायचा अधिकार नाही म्हणून धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार आहे, असा दावा संजय गायकवाड यांनी केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com