VIDEO : आमदार संतोष बांगर यांनी थेट मॅनेजरच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं?

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला
Mla Santosh Bangar Latest Viral Video
Mla Santosh Bangar Latest Viral VideoSaam Tv

हिंगोली : आपल्या आक्रमक स्वभावाने राज्यभर प्रसिद्ध असलेले शिंदे गटातील (Eknath Shinde) हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) पुन्हा एकदा चर्चेत आलेत. कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार बांगर यांच्याकडे प्राप्त झाली. तक्रार प्राप्त होताच बांगर यांनी भोजन योजनेचा गैरप्रकार समोर आणला. इतकंच नाही तर, त्यांनी तेथील मॅनेजरच्या कानशिलातही लगावली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Mla Santosh Bangar Latest Viral Video Latest News)

Mla Santosh Bangar Latest Viral Video
नवऱ्याने कपाटात ठेवलेली दारू बायकोनं संपवली; त्यानंतर घडलं भयंकर

नेमकं काय घडलं?

कामगार विभागाच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या मध्यांन्ह भोजन योजनेचा गैरप्रकार शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पुढे आणला. गरीबांना नित्कृष्ट दर्ज्याचे जेवण पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आमदार बांगर यांच्या कडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी नंतर , शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी प्रत्यक्ष हे जेवण तयार करण्यात येणाऱ्या लिंबाळा एमआयडीसी परिसरातील ठिकाणी भेट दिली.

या ठिकाणी शिजवण्यात येणारे अन्न निकृष्ट असल्याचे बांगर यांच्या निदर्शनास आले. याचा जाब त्यांनी संबंधित ठेकेदार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारला. मात्र सगळ्यांकडून उडवा उडीचे उत्तर मिळाल्याने आमदार संतोष बांगर चांगलेच संतापले. त्याठिकाणी असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाला कानशिलात लगावून गोरगरिबांच्या जीवाशी का खेळतात असा संतप्त सवाल केला.

दरम्यान आमदार बांगर यांनी पाहणी केलेल्या ठिकाणी बुरशीजन्य डाळी, शिळे अन्न व सर्वत्र घाण दिसून आली.या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे.

याआधी आम्हाला गद्दार म्हणाल तर थेट थोबाडीत लावली जाईल, अशी धमकी त्यांनी ठाकरे गटाला दिली होती. तसेच ठाकरेंसाठी अश्रू ढाळून पुढच्या ४८ तासांत ते शिंदे गटात सामील झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची जोरदार चर्चा झाली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com