Shivendraraje Bhosale : उदयनराजे पुर्वी कुचकं बाेलायचे आता ते..., शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर

उदयनराजे भाेसले यांच्या टीकेस शिवेंद्रसिंहराजेंचे प्रत्युत्तर.
Satara, Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale
Satara, Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosalesaam tv

Shivendraraje Bhosale News : उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) हे नेहमी कुचकंपणाने बाेलतात. परंतु काल त्यांचे बाेलणे हे रागातून दिसून आले. त्यामुळे नेमकी माशी कूठं शिंकली हे कळत नाही, असाे असं प्रत्युत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी उदयनराजेंच्या (satara) टीकेवर दिलं.

उदयनराजे भाेसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर नुसतं मिशा पिळून काही हाेत नसतं विकासासाठी कष्ट घ्यावे लागतात अशी टीका केली हाेती. त्यास आणि अन्य विषयांबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना उत्तर दिलं. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले ते म्हणातेहत कामं केली, हे केलं, ते केलं. कधी आणि कूठं गेले हाेते ते निधी आणायला सांगावं त्यांनी. कासच्या भिंतीसाठी काेणी निधी आणला, हद्दवाढ काेणामुळं झाली हे तुम्ही (पत्रकार) पण जाणता. अजित पवार यांनी सहकार्य केल्यानं हे घडलं असेही शिवेंद्रराजेंनी नमूद केले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले उदयनराजे हे नुकतेच मुंबईतून परतले. त्यानंतर त्यांचे काय बिनसले आहे हे त्यांनाच माहिती. पुर्वी ते कुचकंपणाने टीका करीत असे मात्र आता ते रागा रागाने टीका करीत आहेत. त्यामुळे त्यांचे काय बिनसलं आहे हे समजेना. ते नेहमी समाराेसमाेर या असं म्हणतात आणि आल्यावर पेढा भरवितात हे सर्वांनी पाहिले आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत बिनविराेध झाल्यावर ते सुरुचीत समाराेसमाेर आले हाेते हे सर्वांनी पाहिले असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Satara, Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale
I Love You म्हण नाही तर गल्लीत बॅनर लावीन, युवकावर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com