Disqualification Petition: मोठी बातमी! अपात्रतेची टांगती तलवार असलेले आमदार शरद पवारांच्या संपर्कात? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

MLA With Disqualification Notice: आमदारांवर कारवाई करत अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV

Maharashtra Political News:

नव्याने अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. अपात्रतेची नोटीस बजावलेल्या आमदारांपैकी काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. (Latest Marathi News)

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राष्ट्रवादीत बंड केलं. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांवर कारवाई करत अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती.

Sharad Pawar
Maharashtra Political Crisis : Ajit Pawar लवकरच भूमिका घेणार? अजित पवारांची घुसमट होतेय?

नव्याने अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांपैकी काही आमदार पवारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे अजित पवार गट अस्वस्थ असल्याचं देखील म्हटलं जातंय.

अपात्रतेची कारवाई असलेले संबंधित आमदार माघारी आल्यास त्यांच्या अपात्रते संदर्भात पुनर्विचार होणार आहे. मात्र मंत्री झालेल्या नऊ जणांविरोधात राष्ट्रवादीची कारवाई कायम राहणार आहे. आपली आमदारकी वाचवण्यासाठी काही आमदार पुन्हा पवारांच्या संपर्कात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडू मिळालीये.

Sharad Pawar
Pune Dagdusheth Temple|गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे मंदीर प्रशासनाचे आवाहन

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com