Kokan News : जे 'मविआ' ला जमलं नाही ते शिंदे-फडणवीस सरकारनं केलं, काेकणातील आमदाराच्या पाठपूराव्याला यश

या दुर्दैवी घटनेनंतर या कॉजवेच्या जागी उंच पूल उभारण्याची मागणी करण्यात आली हाेती. ती आता पुर्णत्वास येत आहे.
MLA Yogesh Kadam, MVA, Khed, bridge
MLA Yogesh Kadam, MVA, Khed, bridgesaam tv

- जितेश काेळी

Kokan News : खेड तालुक्यातील किंजळे तर्फे नातू येथे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या कॉजवेच्या जागी आता नवीन उंच पूल उभारण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. या नवीन पुलाचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याचा निर्धार दापोली विधानसभा मतदार संघाचे शिंदे गटातील आमदार योगेश कदम (yogesh kadam latest marathi news) यांनी व्यक्त केला आहे.

दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात याच कॉजवेवरून पाणी जात असल्याने एका लहान मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी उशीर झाल्याने उपचारा अभावी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेची दखल घेत आमदार योगेश कदम यांनी पुलाच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आता प्रत्यक्षात या पुलाचे (bridge) काम सुरू झाले आहे.

MLA Yogesh Kadam, MVA, Khed, bridge
Mumbai Local Mega Block : रविवारी रेल्वेचा मेगा ब्लाॅक; प्रवाशांसाठी बेस्ट सज्ज, शनिवारपासून जादा बसेस

कोकणातील सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या किंजळे तर्फे नातू गावातील एका वर्षीय चिमुकलीचा दोन वर्षांपूर्वी 17 ऑगस्ट 2020 रोजीच्या मध्यरात्री दवाखान्यात उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने मृत्यू झाला होता. तालुक्याच्या दवाखान्यात जाण्यासाठी चारचाकी गाडीची व्यवस्था करून देखील या चिमुकलीला दवाखान्यात (hospital) वेळेत पोहोचवता आले नव्हते.

MLA Yogesh Kadam, MVA, Khed, bridge
Trains Cancelled : तपोवन एक्सप्रेससह मुंबईला जाणा-या १२ ट्रेन रद्द

कारण गावातून बाहेर पडणाऱ्या वाटेवर असणाऱ्या नदीवरील कॉजवेवरून पाणी जात असल्याने या चिमुकलीला दवाखान्यात नेण्यासाठी तब्बल एक तास उशिर झाला. जेंव्हा त्या चिमुकलीला दवाखान्यात नेले तेंव्हा डॉक्टरांनी तपासणी करून तिचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतर या कॉजवेच्या जागी उंच पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.

MLA Yogesh Kadam, MVA, Khed, bridge
Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईंच्या झाेळीत ३९८ कोटींचे दान

पण दोन वर्षांमध्ये महाविकास आघाडी (mva) सरकारच्या काळात या पुलाच्या उभारणीसाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मात्र या गंभीर घटनेची दखल घेतली गेली. दापोली विधानसभा मतदार संघाचे शिंदे गटातील आमदार योगेश कदम (mla yogesh kadam) यांनी या पुलाच्या मागणीसाठी पाठपुरावा केला आणि प्रत्यक्षात या पुलाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात देखील झाली. (ratnagiri latest marathi news)

MLA Yogesh Kadam, MVA, Khed, bridge
Veer Sawarkar Row : भाजप खासदार म्हणतात, 'घराेघरी जाऊन सांगा राहुल गांधींचा डीएनए तपासला पाहिजे' (पाहा व्हिडीओ)

आज आमदार योगेश कदम यांनी या पुलाच्या कामाची अधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष पाहणी केली व यापुढे अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण केले जाईल अशी ग्वाही दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com