बीड: ...अन् आंदोलनकर्त्या महिलांना उतरवायला स्वतः झाडावर चढले आमदार!

तर पालकमंत्री धनंजय मुंडे आंदोलन प्रमुखावर संतापले
बीड: ...अन् आंदोलनकर्त्या महिलांना उतरवायला स्वतः झाडावर चढले आमदार!
संदीप क्षीरसागरविनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांचे थकित वेतन मिळावे. या मागणीसाठी आज सकाळपासूनच दोन महिलांनी झाडावर चढून आंदोलन (Agitation) केले होते. दरम्यान याच आंदोलनस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट दिलीय.

संदीप क्षीरसागर
Republic Day 2022: महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात

या भेटीदरम्यान आंदोलन प्रमुखावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चांगलेच संतापले होते. तर या महिलांना झाडावरून खाली उतरविण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले, आमदार क्षीरसागर यांच्या विनंती नंतर आंदोलनकर्त्या महिला खाली उतरल्या आहेत. या महिलांचा वेतनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलंय.

हे देखील पहा-

बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिला कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे यापूर्वी देखील या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या झाडावर चढून चालू केलं होतं. आज पुन्हा झाडावर चढून आंदोलन केल्यानं प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.