Satara: 'बारामतीच्या जेवढे नादाला लागले तेवढे सगळे संपले'

किसनवीर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमुळे सातारा जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
Shashikant Shinde & Sharad Pawar, Satara, Shashikant Shinde latest marathi news, Maharashtra Political News Updates, Shashikant Shinde on Sharad Pawar
Shashikant Shinde & Sharad Pawar, Satara, Shashikant Shinde latest marathi news, Maharashtra Political News Updates, Shashikant Shinde on Sharad Pawar SaamTV

सातारा : बारामतीच्या (baramati) जेवढे नादाला लागले तेवढे सगळे संपले. ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यावर टीका केल्याशिवाय विराेधकांचा एकही दिवस जात नाही. ज्यांना साहेबांमुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे त्यांनी त्यांच्यावर टीका करु नये अन्यथा संपून जाल असा समाचार आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणा-यांचा माध्यमांशी बाेलताना घेतला. (Shashikant Shinde latest Marathi news)

सातारा जिल्ह्यातील किसनवीर साखर कारखान्याच्या निवडणुकी निमित्त विविध तालुक्यात आमदार मकरंद पाटील आणि माजी आमदार मदन भाेसले यांच्या गटाकडून सभा आयाेजित केल्या जात आहे. या सभांमध्ये आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे हे त्यांच्या त्यांच्या गटात सहभागी हाेऊन एकमेकांवर टीका करताना दिसताहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतेच विराेधकांना xx लावण्याची भाषा केली. तर आमदार महेश शिंदे यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

Shashikant Shinde & Sharad Pawar, Satara, Shashikant Shinde latest marathi news, Maharashtra Political News Updates, Shashikant Shinde on Sharad Pawar
Satara: ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ प्रेरणादायी ठरेल : वृषालीराजे भोसले

आज माध्यमांशी बाेलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी काेणाचेही नाव घेता (आमदार महेश शिंदे) सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्था (rayat shikshan sanstha) आणि जरंडेश्वर कारखाना (jarendeshwar sugar factory) संदर्भात सातत्याने टीका करण्याचे विराेधकांचे काम सुरु आहे. खरं तर त्यांचा राजकीय जन्म हा पवार साहेबांमुळे झाला आहे. तुम्हांला राजकारणात (politics) आणि व्यवसायात महत्व साहेबांमुळेच प्राप्त झाले आहे हे विसरु नका. अहंमपणा फार काळ टिकत नसताे. पवार साहेबांना देशाचे पंतप्रधान सुद्धा मान देतात हे त्यांनी विसरु नये.

बारामतीच्या जेवढे नादाला लागले तेवढे संपले आहेत. राजकारणातील ताजे उदाहरण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील. आता त्यांना (आमदार महेश शिंदे) देखील त्यांची जागा दाखविण्याचा आम्ही प्रयत्न करु असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Shashikant Shinde & Sharad Pawar, Satara, Shashikant Shinde latest marathi news, Maharashtra Political News Updates, Shashikant Shinde on Sharad Pawar
Satara: मराठवाड्याप्रमाणे जिल्ह्यात तुर पिक लागवडीवर भर द्या : बाळासाहेब पाटील
Shashikant Shinde & Sharad Pawar, Satara, Shashikant Shinde latest marathi news, Maharashtra Political News Updates, Shashikant Shinde on Sharad Pawar
Satara: राजकीय परिस्थिती बदलली अन् मकरंद पाटलांनी डाव साधला : मदन भाेसले
Shashikant Shinde & Sharad Pawar, Satara, Shashikant Shinde latest marathi news, Maharashtra Political News Updates, Shashikant Shinde on Sharad Pawar
Satara: माजी आमदार मदन भाेसले गटास धक्का; चाैघांचा NCP त प्रवेश

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com