Nagpur : मनसे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणासाठी पोलिसांकडे पुन्हा परवानगी मागणार

Nagpur MNS News : नागपूरातील ३२ पोलीस स्टेशनमध्ये मनसे कार्यकर्ते जाणार असून पोलिसांकडून हनुमान चालीसेची परवानगी मागण्यात येणार आहे.
Nagpur : मनसे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणासाठी पोलिसांकडे पुन्हा परवानगी मागणार
MNS activists will again ask the police for permission to recite Hanuman Chalisa, Nagpur Latest Marathi NewsSaam TV

नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसैनिकांना केले होते. त्यानंतर आज अनेक मशिदींमध्ये (Masjid) सकाळची अजान ही भोंग्याविना झाली. मात्र नागपूरातील (Nagpur) मनसेचे कार्यकर्ते हनुमान चालीसेचे पठण करण्यावर ठाम आहे. यासाठी मनसे (MNS) कार्यकर्ते आज पुन्हा पोलिसांची परवानगी मागणार आहेत. नागपूरातील ३२ पोलीस स्टेशनमध्ये मनसे कार्यकर्ते जाणार असून पोलिसांकडून हनुमान चालीसेची परवानगी मागण्यात येणार आहे. (MNS activists will again ask the police for permission to recite Hanuman Chalisa)

हे देखील पाहा -

मनसेतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानं मनसेचे पदाधिकारी शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत. यावेळी पोलिसांकडून हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागण्यात येणार आहे. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते हनुमान चालीसा लावल्यावर ठाम आहेत. दरम्यान राज्यातील अनेक मशिदींमध्ये सकाळची अजान ही भोंग्याविनाच झाली. तर ज्याठिकाणी मशिदींवरील भोंग्यावर अजान झाली त्याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्पीकरवर हनुमान चालीसा लावली. ४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. आज मनसेने दिलेला तो अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने राज्यभरात मनसेचं आंदोलन सुरु आहे. (Nagpur Latest Marathi News)

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.