निलंगा-कासार शिरसी रस्त्यासाठी मनसेचे रास्तारोको आंदोलन

अनेकांचे अपघात होऊन त्यांना आपले हात पाय गमवावे लागले आहेत.
निलंगा-कासार शिरसी रस्त्यासाठी मनसेचे रास्तारोको आंदोलन
निलंगा-कासार शिरसी रस्त्यासाठी मनसेचे रास्तारोको आंदोलन दीपक क्षीरसागर

लातूर - निलंगा ते कासार शिरसी जाणाऱ्या खराब रस्त्याचे काम तात्काळ करावे म्हणत शासनाच्या विरोधात घोषणा देत मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली दादगी पाटीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

निलंगा मतदार संघातील निलंगा ते कासार शिरसी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग नऊला जोडला जातो परंतु हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याकारणाने अनेक नागरिकांचे अपघात झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांचे अपघात होऊन त्यांना आपले हात पाय गमवावे लागले आहेत.

निलंगा-कासार शिरसी रस्त्यासाठी मनसेचे रास्तारोको आंदोलन
संतापजनक! दोघा भावांकडून 16 वर्षीय बहिणीवर वारंवार अत्याचार

अनेकवेळा मनसेच्या वतीने निलंगा बांधकाम विभागाला सदरील रस्ता दुरूस्त करण्यासाठी निवेदन दिले आहेत. परंतु याची दखल न घेतल्याने आज मनसेचे जिल्हा अध्यक्ष नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली दादगी पाटी येथे असंख्य कार्यकर्त्यांसह रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com