औरंगाबादेत पाणी प्रश्न पेटला; मनसे मुख्यमंत्र्यांना २५ हजार पत्रे पाठवणार

Aurangabad News : औरंगाबाद शहरात पाणीप्रश्नावरून मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.
MNS agitation for water issue against MVA Government
MNS agitation for water issue against MVA Government Saam Tv

औरंगाबाद : औरंगाबादेत (Aurangabad) पाणीप्रश्नावरून सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. औरंगाबाद महापालिकेत शुक्रवारी तरुणांनी पाणीप्रश्नी निवेदन द्यायला जाताना आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यावर धावून गेले होते. या तरुणांच्या विरोधात औरंगाबाद महापालिकेत पोलिसात तक्रार अर्जही दाखल केला. सदर घटना ताजी असताना औरंगाबाद शहरात महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष (MNS) देखील पाणी प्रश्नावरून (Water Issue) आक्रमक झाला आहे. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचा आरोप करीत मनसेही मैदानात उतरली आहे. मनसेनं शहरात पाणी संघर्षयात्रा काढली आहे. (Aurangabad Latest News in Marathi)

हे देखील पाहा -

ऐन उन्हाळ्यात औरंगाबादकरांचे पाणी प्रश्नामुळे प्रचंड हाल होत आहे. या पाणीप्रश्नावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, त्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचा आरोप करीत मनसे मैदानात उतरली आहे. मनसेनं शनिवारपासून पाणी संघर्षयात्रा काढली आहे. शहरातील प्रत्येक वार्डात ही पाणी संघर्ष यात्रा जाणार आहे. यात नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी पत्र लिहून घेण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांनी २५ वर्ष पाणीप्रश्न सोडवला नाही, त्यामुळे मनसेकडून मुख्यमंत्र्यांना २५ हजार पत्र पाठविण्यात येणार आहे. मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेमुळे शहारातील पाण्याचा प्रश्न काही दिवस पेटताच राहणार असल्याचे चित्र आहे.

MNS agitation for water issue against MVA Government
शरद पवारांना दिलेल्या धमकीवरुन समता परिषद आक्रमक, पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या

दरम्यान, पाणी समस्येवरून औरंगाबादकर प्रचंड त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी याच मुद्यावरून औरंगाबाद महापालिकेत जोरदार राडा झाला होता. पाणीप्रश्नावरून पालिका आयुक्तांना निवदेन देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची आयुक्तांसोबतच चांगलीच बाचाबाची झाली होती. निवदेन गेलेल्या तरुणांनी थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेले होते. त्यावेळी पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी आयुक्तांचा बचाव केला. या घटनेमुळे पालिका परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पालिकेनं सदर दोन तरुणांच्या विरोधात सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. तसेच या घटनेच्या निषेधार्थ पालिकेतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर कामबंद आंदोलन केले होते.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com