
Raj Thackeray On Uddhav Thackeray: सुप्रीम कोर्टाने काल सत्तासंघर्षावर आपला निर्णय जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला नको होता, असे निरीक्षण नोंदवलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर ठाकरे गटाला धक्का बसला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील राजकाराणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी विचार करायला हवा होता, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वसई विरार मीरा भाईंदरसह ठाणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात मीरा रोड येथून सुरू केली असून पुढे वसई व त्यानंतर ठाणे अशी असणार आहे.
यावेळी राज ठाकरे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. याच दरम्यान त्यांना पत्रकारांनी सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांनी या सत्तासंघर्षावर अधिक बोलणं कटाक्षाने टाळलं. राज ठाकरे पुढे म्हणाले, 'शिवसेना हा माझा पक्ष नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत मला प्रश्न विचारू नका. माझा वेळ वाया घालवू नका, असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला.
राज ठाकरे सत्तासंघर्षावरील कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करताना म्हणाले, 'कालच्या निर्णयात म्हटलं आहे की, सर्व प्रकिया चुकली. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. मी यात वाचलं की, विधीमंडळातील गटाला पक्ष म्हणून मान्यता नसेल, तर बाहेरच्या गटाला पक्ष म्हणून मान्यता असेल. निवडणूक आयोगाने तर चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देऊ केलं आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? सर्व प्रकरण गोंधळात्मक आहे'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.