ही मानसिक विकृती, तिला वेळीच आवर घालायला हवा; केतकी चितळेवर राज ठाकरे भडकले

केतकी चितळेच्या विरोधात कळवा आणि पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ही मानसिक विकृती, तिला वेळीच आवर घालायला हवा; केतकी चितळेवर राज ठाकरे भडकले
Raj Thackeray And ketaki chitalesaam tv

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळेने (ketaki chitale) आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेयर केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून केतकीच्या विरोधात कळवा आणि पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे केतकीच्या अडचणी वाढल्या आहेत. तसंच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनीही केतकीवर कारवाई होणार असल्यांच माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, केतकीच्या आक्षेपार्ह पोस्टमुळं राजकीय वातावरण तापलं असून सर्वच स्तरातून केतकीचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही सोशल मीडियावर पत्रक काढून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा! असं राज ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

Raj Thackeray And ketaki chitale
शरद पवारांना दिलेल्या धमकीवरुन समता परिषद आक्रमक, पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या

पत्रक काढून राज ठाकरेंनी केला निषेध

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली.खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही.त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत..!

Raj Thackeray And ketaki chitale
शरद पवारांबद्दल केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट, अमोल कोल्हे भडकले; म्हणाले, गरळ ओकण्याआधी...

आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.